कडा (प्रतिनिधी) :- आनंदराव धोंडे महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवक दिन आणि राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच्. जी. विधाते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शामभाऊ भोजने, डॉ. जी. व्ही. मंडलिक, उपप्राचार्य डॉ. बी. एम. चव्हाण हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांच्या पूजनाने झाली. इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. एस. डी. गायकवाड यांनी प्रास्ताविक करताना स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती सांगितली. डॉ. जी. व्ही. मंडलिक यांनी आजच्या महिला राजमाता जिजाऊंनी जे संस्कार या महाराष्ट्राला दिले ते पाळत नसल्याची खंत व्यक्त केली. शामभाऊ भोजने यांनी स्वामी विवेकानंद आणि जिजाऊ यांच्याविषयी माहिती सांगत आपले मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य डॉ. बी. एम. चव्हाण यांनी जिजाऊंनी शिवरायांना जे सर्व जाती-धर्मांचे राज्य निर्माण करायला सांगितले तेच आताच्या राज्यकर्त्यांनी जिजाऊंनी सांगितलेली सूत्र पाळली तर आताही येऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला. अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डॉ. एच्. जी. विधाते सरांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या चारित्र्याच्या अभ्यासातून आपले चारित्र्य घडत असते तसेच नवीन पिढ्यांमध्ये महान व्यक्तींचे चारित्र्य संस्कारित होऊन पिढ्या घडत असतात. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. शैलजा कुचेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. एम. जी. राजपांगे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-प्राध्यापिका, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.