spot_img
spot_img

अमोलक संस्थेच्या शोभायात्रेत पारंपरिक लोककला, लोक वाद्ये व सजीव देखावे ठरले प्रमुख आकर्षण

कडा ( प्रतिनिधी ) :- कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित भव्य शोभा यात्रा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडली. राम, लक्ष्मण, सिता, हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँ साहेब, बाल शिवाजी यांसारखे सजीव देखावे, वासुदेव, पिंगळा, गोंधळ, नंदीवाला, आदिवासी फुगडी नृत्य, महिला व पुरुषांचे बंजारा लेंगी नृत्य, किंगरीवाला, तुतारी, सुर, सनई, चौघडा, हलगी, संबळ, दिमडी, टाळ, तुणतुणे ही पारंपरिक लोकवाद्ये त्याच बरोबर पंजाबी ढोल, चाळीसगावचा सुप्रसिद्ध बँड ही या शोभायात्रेची ठळक वैशिष्ट्ये ठरली.
मोतीलाल कोठारी विद्यालयापासुन निघालेली शोभा यात्रा संपुर्ण कडा शहरात मिरवण्यात आली.
सकाळी मोतीलाल कोठारी विद्यालयाच्या क्रीडांगणावर मान्यवरांच्या उपस्थितीत नवकार महामंत्र, श्री अमोलक ऋषिजी महाराज प्रतिमा पूजन, अमोलक गीत सादरीकरण करून या कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष योगेश भंडारी, कार्याध्यक्ष कांतीलाल चाणोदिया, विश्वस्त अध्यक्ष गोकुळदास मेहेर, उपाध्यक्ष अनिल झाडमुथा, बिपिन भंडारी, प्रधानमंत्री हेमंत पोखरणा, मानद मंत्री विनोद बलदोटा, मानद मंत्री डॉ. महेंद्र पटवा, कोषाध्यक्ष डॉ. उमेश गांधी, विश्वस्त बाबुलाल भंडारी, कार्यकारी सदस्य प्रफुल्ल पोखरणा, संजय मेहेर, संतोष भंडारी, संतोष गांधी, संजय भंडारी, अजय चोरबेले, प्रमोद भळगट, ललित कटारिया, संतोष शिंगवी, विश्वस्त सदस्य दिलीप पटवा, ह . भ. प. बबन महाराज बहिरवाल, ह.भ.प. दादा महाराज चांगुणे, श्रावक संघाचे अध्यक्ष रतिकलालजी कटारिया, माजी सभापती संजय ढोबळे, सरपंच युवराज पाटील, सभापती रमजान तांबोळी, अनिल ढोबळे, पुंडलिक कर्डिले, उपसरपंच बाळासाहेब कर्डिले, शांतीलाल शिंगवी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थी विद्यार्थिनी, झेंडा गाडी, लेझिम पथक, झांज पथक, ग्रंथ दिंडी, पंढरीची वारी, गणेशोत्सव, मौलाली बाबा पथक, मराठी बाणा, कर्तबगार महिला, महाराष्ट्रीयन महिला, मंगळागौर, सावित्रीच्या लेकी, विविधतेतून एकता, सर्व धर्म समभाव, विविध पारंपरिक व्यावसायिक, चांद्रयान अशा देखाव्यात सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अजित गुगळे, महेश म्हस्के, डॉ. गफ्फार सय्यद, प्राचार्य डॉ. नंदकुमार राठी, डॉ. जवाहर भंडारी, डॉ. तुकाराम गोंदकर, ज्योती काकडे, ज्योती शेळके, पद्मा औताडे, वैष्णवी कर्डिले, भीमाशंकर मराठे, अशोक खाडे, मथाजी शिकारे, धनंजय कोकने, अनिल पोखरणा, महेंद्र पेटकर, गणेश रावळ, डॉ. जमीर सय्यद, डॉ सुनिल पंढरे, प्रा. निलेश गांधी, विजय सरडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रा. डॉ. राधाकृष्ण जोशी यांनी समाज माध्यम प्रसिद्धीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. लोककला अभ्यासक भगवान राऊत यांनी या शोभा यात्रेचे समन्वयक म्हणून काम पाहिले. डॉ. जवाहर भंडारी यांनी सूत्रसंचालन केले. प्रधानमंत्री हेमंत पोखरणा यांनी प्रास्ताविक केले. डॉ. महेंद्र पटवा यांनी आभार मानले. मान्यवरांच्या हस्ते हिरवे झेंडे दाखवून व हवेत ५ रंगांची फुगे सोडवून या शोभा यात्रेचे शानदार उद्घाटन झाले. शनिवार दिनांक १३ जानेवारी रोजी सायंकाळी संस्थेच्या संपूर्ण विभागाच्या वार्षिक स्नेह संमेलनास प्रारंभ होणार आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!