spot_img
spot_img

पाथर्डी शेवगाव तालुक्यात आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित नमो चषक क्रिडा स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

पाथर्डी (प्रतिनिधी) :- क्रीडा क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत गेल्या काही वर्षात तालुक्याचा झेंडा अभिमानाने फडकत आहे. खेळाकडे करिअर म्हणून पहा. शारीरिक मानसिक विकासाबरोबरच व्यक्तिमत्व विकास खेळाच्या माध्यमातून निश्चित होतो. देशपातळीवर खेळाकडे लक्ष देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून सुरू झालेला उपक्रम कौतुकास्पद व खेळाडूंचे मनोबल वाढवणारा ठरेल, असा विश्वास राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती कोमल वाकळे यांनी व्यक्त केला. नमो चषक क्रिकेट स्पर्धांसह वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये आमदार मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, संपर्क समन्वयक विवेक नाईक, बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे, भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, कार्यक्रमाचे संयोजक अभय आव्हाड, जैन विद्यालयाचे सचिव सतीश गुगळे, प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, युवा मोर्चाचे सचिन वायकर, अमोल गर्जे यासह पदाधिकारी, डॉक्टर, व्यापारी, कार्यकर्ते, महिला मंडळ, गणेश मंडळे, वनदेव मॉर्निंग वॉक ग्रुप, बचत गटाचे सदस्य, सामाजिक व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, सर्व शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोना काळानंतर प्रथमच एवढ्या भव्य प्रमाणात सर्व समावेशक असा कार्यक्रम झाला. वीर सावरकर मैदानातून वॉकेथॉन स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांनी केले. पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला. राष्ट्रीय महामार्गाने पायी चालणारे हजारो उत्साही नागरिक सुमारे दोन किलोमीटर अंतर चालले. जिल्ह्यातील अशा स्वरूपाचा नमो चषक क्रिडा स्पर्धा आज पहिलाच कार्यक्रम पाथर्डीत संपन्न झाला. उदघाटनाचा कार्यक्रम बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर संपन्न झाला. यावेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष भालसिंग म्हणाले, खेळाडू नोंदणी मध्ये पाथर्डी तालुक्याने आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पाचवा क्रमांक मिळवला असून सुमारे 30 हजार खेळाडूंची नोंदणी पूर्ण झाली आहे. अशा गतीने काम झाल्यास राज्यात पाथर्डी तालुका ग्रामीण भागात प्रथम क्रमांक येऊ शकतो. धावपळीच्या जीवनात खेळ, व्यायाम, योगसाधना यासाठी प्रत्येकाने वेळ देण्याची गरज आहे. सर्व कार्यक्रमांमध्ये तालुक्याची चांगली आघाडी आहे. पाथर्डी, शेवगाव तालुक्यात मिळून विविध प्रकारच्या एकूण 18 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. असे भालसिंग म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभय आव्हाड, सूत्रसंचालन राजीव सुरवसे तर आभार आमदार मोनिका राजळे यांनी मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!