पाथर्डी (प्रतिनिधी) :- महिला बचत गट चळवळीतून हजारो महिलांना रोजगार मिळून त्यांच्या प्रपंचाला चालना मिळते. त्यामुळे मॉल संस्कृती ऐवजी अशा कार्यक्रमांतून खरेदी केल्यास ग्रामिण अर्थकारणाला बळकटी मिळून बचत गटांना प्रोत्साहीत करता येईल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांनी केले.
युवा दिन व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्त येथील संस्कार भवन येथे दोन दिवसीय महिला बचत गटातील खाद्य महोत्सव, प्रदर्शन व वस्तु विक्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून त्या शुभारंभ त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जेष्ठ महिला शशिकला गांधी, साखरबाई बोरूडे, शोभाताई दहिफळे, चंद्रकला खेडकर, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष सविताताई भापकर, माजी नगराध्यक्षा रत्नमाला उदमले, आरती निऱ्हाळी,बचत गट समन्वयीका भारती आसलकर, तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, माजी नगरसेवक बंडू पाटील बोरूडे, रामराव चव्हाण, देवा पवार, योगेश रासने, राजेंद्र बोरूडे, जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरूडे, पांडूरंग शिरसाट मेजर, हुमायून आतार, विष्णूपंत ढाकणे, अर्जून धायतडक, आदी उपस्थित होते.
यावेळी ढाकणे म्हणाले, आज कोणत्याही क्षेत्रात महिलांची आघाडीची भूमिका अभिमानास्पद आहे. पुर्वी म्हणायचे महिला ह्या पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. मात्र आज महिला पुरूषांच्याही पुढे एक पाऊल त्यांच्या कर्तबगारीने आहेत. मुलगा असो वा मुलगी असा भेद आता शिल्लक ठेवता कामा नये उलट मुलगीच आता उध्दारकर्ती बनली आहे.
राजमाता जिजाऊ माँ साहेबांनी स्वराज्याचे स्वप्न पाहून छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कारातून घडवून जगात नवा इतिहास प्रस्थापित केला. त्यांनी जर छत्रपती शिवाजी महारांजामध्ये स्वराज्याचे स्फुलिंग चेतविले नसते तर आज काय परिस्थिती असती. याची कल्पना करा प्रत्येक महिलांमध्ये आपल्या पाल्यांना घडविण्याची प्रचंड क्षमता असते त्यामुळेच आज देश प्रगतीपथावर आहे. मात्र आजही अनेक महिला या दैनंदिन जीवनाशी संघर्ष करत झगडत आहे एकीकडे विकासाचे आकडे व योजना दाखवून त्याच देशातील महिला अनेक समस्यांचा सामना करत आहेत. त्यासाठी बचत गटाची चळवळ अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. असे ते शवटी म्हणाले.
प्रास्ताविक राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा योगीता राजळे यांनी केले तर आभार राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्ष ज्योती जेधे यांनी मानले.