देऊळगाव घाट (प्रतिनिध)राजमाता आश्रम शाळा मराठवाडी, तालुका आष्टी जिल्हा बीड येथे ,शाळेतील मुलांचा आनंदी बाजार भरवण्यात आला होता. या आनंदी बाजाराचे उद्घाटन गावचे सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायटी चेअरमन, शाळेचे प्राचार्य, यांच्या हस्ते करण्यात आले.
या आनंदी बाजारामध्ये इयत्ता चौथी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या आनंदी बाजारात विविध वस्तूंचे विद्यार्थ्यांनी स्टॉल देखील लावले होते. या आनंदी बाजाराचा हेतू एकच की विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढवणे, विद्यार्थ्यांना नफा तोटा चे ज्ञान होणे, खरेदी-विक्री, संवाद कौशल्य वाढवणे, गणितीय आकडेमोड समजणे, मुलांची बुद्धिमत्ता वाढवणे हा एकमेव उद्देश आनंदी बाजाराचा असतो.
मराठवाडी गावातील सर्व लहान थोरांनी आनंदी बाजारात खरेदी विक्री करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत केला. या आनंदी बाजारात हजारो रुपयांची उलाढाल झाली, असे शाळेचे प्राचार्य दानवे सर यांनी सांगितले