पाथर्डी (प्रतिनिधी) :- क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समिती समिती व श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते. या शोभायात्रेचा प्रारंभ शहराच्या कसबा विभागातील श्री संत सावता महाराज मंदीर येथून करण्यात आला.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मोहन महाराज सुडके, श्री तिलोक जैन प्रसारक मंडळाचे सचिव सतिश गुगळे, खजिनदार सुरेश कुचेरिया, विश्वस्त राजेंद्र मुथ्या, डॉ.अभय भंडारी, माजी नगरसेविका सुरेखा गोरे, माजी नगरसेवक रमेश गोरे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दुधाळ, उद्योजक दत्ता सोनटके, तुकाराम पानखडे, आप्पा तुपे, सावता सेनेचे ठकसेन तुपे, राजेंद्र सोनटक्के, गणेश सोनटक्के, माणिक साखरे, प्राचार्य अशोक दौंड, विजयकुमार छाजेड, दिलावर फकीर, अजय भंडारी, सुधाकर सातपुते , महेंद्र राजगुरू,अनिल पानखडे आदींच्या उपस्थितीत झाले.
या शोभायात्रेत सजवलेला रथ ,बँड पथक,वाद्य वृंद ,विविध वेशभूषा सादर केलेल्या विद्यार्थिनी यामुळे मिरवणूक आकर्षक ठरली.शाहीर भारत गाडेकर यांचे गीत गायन व त्यांना सचिन साळवे,अल्ताफ शेख, पोपट पारखे यांची मिळालेली साथ सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. शोभायात्रेची सांगता श्री तिलोक जैन विद्यालयात झाली .यावेळी दानशूर कायकर्ते आनंदकुमार चोरडिया यांच्यातर्फे शोभायात्रेतील मान्यवर व सर्व विद्यार्थी यांच्याकडून प्रसादाचे वाटप करण्यात आले.सुत्रसंचालन सुनिल कटारिया यांनी करून आभार डॉ.अनिल पानखडे यांनी मानले.