spot_img
spot_img

दुर्गादेवी माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

धामणगाव (प्रतिनिधी)दि. 3 जानेवारी 2024 रोजी दुर्गादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जाटदेवळे ता. पाथर्डी येथे भारतातील पहिल्या शिक्षिका. मुख्याध्यापिका स्री शिक्षणाच्या प्रणेत्या .विद्येची जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती राठोड मॅडम होत्या.मुख्याध्यापक श्री नाकाडे सर यांनी प्रास्ताविक केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी व दिव्य लोकप्रभाचे पत्रकार दादा पवळ हजर होते. यावेळी विद्यालयात वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .शाळेतील काही विद्यार्थिनींनी सावित्रीची वेशभूषा केली होती. मुख्याध्यापक श्री नाकाडे सर पुढे बोलताना म्हणाले की जर सावित्रीबाई नसत्या तर आज विविध पदावर महिला विराजमान नसत्या सावित्रीबाई फुले यांचा आदर्श ग्रामीण भागातील मुलींनी डोळ्यासमोर ठेवून विविध क्षेत्रांमध्ये उंच भरारी घ्यावी असे विद्यार्थ्यांना आवाहन केले..
“घडलो नसतो मी जर शिकली नसती माझी माय, जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माझी माय”
अध्यक्षिय निवड श्री राठोड सर यांनी केली तर अनुमोदन श्री नेव्हूल सर यांनी दिले .श्री डोंगरे सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .श्री दौंड सर यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी रुईकर सर.पालवे अर्जुन.भोसले सखाराम उपस्थित होते. शेवटी विद्यालयाच्या सहशिक्षिका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा राठोड मॅडम यांचे अध्यक्षिय भाषण झाले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजू शेख सर यांनी केले

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!