spot_img
spot_img

सृष्टी साकलाची जर्मनी येथे उच्च शिक्षणासाठी निवड

पाथर्डी (प्रतिनिधी) : -घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य , प्रचंड प्रतिकूल परिस्थिती , आई वडील दोघांनाही बोलता येत नाही अशी सर्व प्रकारची विपरीत परिस्थिती असताना देखील त्यावर स्वतःच्या जिद्दीच्या , प्रचंड मेहनतीच्या बळावर सृष्टीने मात करत आपले संगणक अभियांत्रिकीतील शिक्षण बार्शी येथून अ प्लस श्रेणीतून पूर्ण केले . त्या नंतर प्रथितयश बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये चांगली प्लेसमेंट मिळवली. परंतु पदव्युत्तर शिक्षणाचे तीचे स्वप्न तिला स्वस्थ बसू देत नव्हते . तीने १ वर्ष नोकरी व अभ्यास दोन्ही चा समतोल साधत अभ्यास केला . आता नुकतीच तीची संगणक अभियांत्रिकीतील पदव्युत्तर शिक्षणासाठी जर्मनी येथे निवड झाली आहे. पुढील दोन वर्ष जर्मनीमध्ये ती पदव्युत्तर अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणार आहे. पाथर्डी येथील सामाजिक व धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारे दिलीपजी साकला यांची ती कन्या आहे .या तिच्या यशाबद्दल जैन युथ फेडरेशन चे अध्यक्ष सचिन भंडारी , प्रमोद खाटेर , निलेश बोरा, राजेंद्र भंडारी , निलेश गांधी , सुनील कटारिया , पारस कर्नावट या सह सर्व सदस्य यांच्या वतीने तिचा यथोचीत सन्मान करण्यात आला. या सह शैक्षणिक क्षेत्रातून तिचे विशेष अभिनंदन होत आहे .

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!