पाथर्डी (प्रतिनिधी):- सामाजिक दायित्वाच्या भावनेतून वडीलांच्या स्मृती प्रित्यर्थ कोरडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे अशी उदात्त भावना मनी बाळगून शाळेला कै. हाजी बाबा मिया शेख (टेलर) यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव मुबारक भाई शेख व मुसा भाई शेख यांनी आरो फिल्टर प्लांट दान दिले.
अशा सामाजिक उपक्रमात गावकऱ्यांनी पुढे येऊन सहभाग घेत आपल्या प्रियजनांच्या स्मृती चिरंतन जागवाव्यात असे आवाहन यावेळी वंचित चे तालुकाध्यक्ष रविंद्र उर्फ भोरू म्हस्के यांनी केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर देशमुख, उपाध्यक्ष युसूफ भाई शेख,
हभप. नवनाथ महाराज राऊत, माजी सरपंच भगवान घुगरे, शिक्षक भत्ताने सर, नानासाहेब जाधव, विकास मस्के, राहुल म्हस्के, बबन काकडे, भैय्या म्हस्के, रवी पवार, बजरंग म्हस्के यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांचे शाळेला आरो फिल्टर प्लांट बसवण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न चालू होते. काही दिवसांपूर्वी गावातील सामाजिक कार्यकर्ते व कोरडगावचे माजी उपसरपंच बाबा मिया शेख यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ काहीतरी सामाजिक काम करावे या हेतूने त्यांच्या दोन्ही मुलांना ही कल्पना आवडली. त्यांच्या प्रयत्नातून आज आरो फिल्टर प्लांट बसवण्यात आले.त्याचे उद्घाटन वैष्णव आश्रमाचे मठाधिपती हभप. प्रवीणजी महाराज व म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक स्कूल कमिटी व कोरडगाव ग्रामस्थांच्या वतीने दोन्ही शेख बंधूंचा सत्कार करण्यात आला.