spot_img
spot_img

देऊळगाव घाट येथे अखंड हरिनाम सप्ताह व महा ज्ञान यज्ञ सोहळ्यास उद्या पासून प्रारंभ

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट जिल्हा बीड येथे 29 नोव्हेंबर रोजी भैरवनाथ जयंती निमित्त अखंड ज्ञानेश्वरी पारायण महायज्ञ सोहळ्यास प्रारंभ होत आहे. हा महायज्ञ सोहळा भागवत महाराज उंबरेकर यांच्या कृपा आशीर्वाद खाली चालू आहे. या सप्ताहाचे हे 35 वे वर्ष आहे. या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार सहभागी होणार आहेत.
या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे गावामध्ये सात दिवस चूल पेटवली जात नाही. या सप्ताह मध्ये रोज सायंकाळी 7ते 9 पर्यंत मगर महाराज, राऊत महाराज, सातपुते महाराज, कुऱ्हे महाराज, आठरे महाराज, मोरे महाराज यांचे कीर्तन होणार आहेत.
या ज्ञान यज्ञ सप्ताहाचे पारायणाचे नेतृत्व गोवर्धन महाराज ठोंबरे हे करणार आहेत.बुधवार दि.6 रोजी ह.भ.प.भागवत महाराज उंबरेकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे या सप्ताहाच्या महाप्रसादाचे अन्नदाते इयत्ता दहावी 2006 ची बॅच ज्ञानेश्वर विद्यालय देऊळगाव घाट या मुला मार्फत आहे.
या सप्ताहात किर्तन व इतर सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन सप्ताह कमिटी मार्फत करण्यात आले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!