बीड (प्रतिनिधी) : मुंबईवरून धाराशिवला पवनचक्कीचे क्रेन घेऊन निघालेला ट्रेलर चालकाचा ताबा सुटल्याने वळणावर पलटी झाला. ही घटना बीड-धामणगाव-नगर राज्य महामार्गावरील पिंपरी घाटा येथील कानिफनाथ घाटात सकाळी दहाच्या सुमारास घडली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबई येथून रविवारी पहाटेच्या दरम्यान मालवाहतूक करणारा ट्रेलर (एमएच २३, एयू ७३१३) हा धाराशिवकडे पवनचक्कीचे क्रेन घेऊन निघाला होता. आष्टी तालुक्यातील पिंपरी घाटा येथील कानिफनाथ घाटात एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रेलर पलटी झाला. यात ट्रेलरचालक प्रशांत मिसाळ जखमी झाला असून त्याच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्याचा सहकारी नितीन मिसाळ (दोघे रा. मिसाळवाडी) हा जखमी झाला आहे.
# दोघेही चुलत भाऊ #
• कानिफनाथ घाटातील वळणावर गेल्या अनेक महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रिलिंग बसवण्याकडे दुर्लक्ष होत आहे. माल वाहतूक ट्रेलर घेऊन निघालेले दोघे एकाच गावातील आणि सख्खे चुलत भाऊ होते. अपघातात दोघेही बचावले.