आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील आठ विभागामधील १७ वर्षाखालील शालेय स्तरावरील मुले आणि मुली यांच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन
आष्टी येथे दि.२८ आणि २९ नोव्हेंबर २०२३ या दोन दिवशी करण्यात आले असून दि.३० नोव्हेंबर २०२३ रोजी निवड चाचणी होणार असून मुले आणि मुलींचा राज्य शालेय संघ निवडले जाणार आहेत.. अशी माहिती या स्पर्धेचे संयोजक आ.सुरेश धस यांनी दिली
आष्टी येथील निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पुढे बोलताना ते म्हणाले की,
दि.२८ नोव्हेंबर रोजी रोजी दु.४.३० वा. आष्टी शहरातून या खेळाडूंची शोभायात्रा आयोजित करण्यात आली असून..
आष्टी शहरातील प्रमुख मार्गावरून या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे..
त्यानंतर सायंकाळी ६.०० वा.आनिषा ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल च्या प्रांगणावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन बीड लोकसभा खा. डॉ. प्रीतम गोपीनाथराव मुंडे यांचे हस्ते होणार असून.. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार साहेबराव दरेकर भारतीय जनता पक्ष तालुका अध्यक्ष अॅड. साहेबराव म्हस्के यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत
या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील.. छ.संभाजीनगर,लातूर,
नासिक, कोल्हापूर, मुंबई, पुणे,अमरावती, नागपूर या आठ विभागातील शालेय मुला मुलींचे संघ भाग घेणार असून या स्पर्धेतून दि.३०नोव्हेंबर रोजी निवड चाचणी घेण्यात येणार असून त्यातून महाराष्ट्र राज्य शालेय मुलांचा आणि मुलींचा संघ निवडण्यात येऊन हे दोन्ही संघ राष्ट्रीय स्तरावरील शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करतील अशी अशी माहिती देऊन आ.सुरेश धस पुढे म्हणाले की अशा प्रकारची राज्यस्तरीय स्पर्धा आयोजन करण्याची संधी मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील होतो आणि अखेर महाराष्ट्र शासनाने ही संधी आपणास प्राप्त करून दिली आहे या स्पर्धेतील खेळाडूंचे क्रीडा कौशल्य पाण्याची संधी आष्टी तालुक्यातील क्रीडा प्रेमींना आणि शालेय विद्यार्थ्यांना पाहण्याची संधी या निमित्ताने मिळणार असून ही स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी स्वागत समिती, निवास व्यवस्था समिती, भोजन समिती आरोग्य समिती, प्रसिद्धी व्यवस्था समिती, अशी व्यवस्था करण्यात आली असून या स्पर्धेसाठी ४ हजार प्रेक्षक बसतील अशी प्रेक्षक गॅलरी आणि दर्जेदार मॅट उपलब्ध करून देण्यात आली असून या स्पर्धेचा शालेय विद्यार्थी आणि क्रीडा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे