spot_img
spot_img

पहाटे मालट्रकने हुलकावणी दिली आणि माऊली ट्रॕव्हल्सबस खड्ड्यात पडली – दैव बलवत्तर म्हणुन प्राणहानी नाही

आष्टी (प्रतिनिधी) शुक्रवारी रात्री पुण्याहून
नांदेडला निघालेल्या माऊली ट्रॅव्हल्सच्या
बसला बीडवरून अहमदनगरकडे जाणाऱ्या एका ट्रकने हुलकावणी दिली.यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरून खड्ड्यात कोसळली.नशीब बलवत्तर म्हणून बसमधील ४० प्रवाशांचा जीव वाचला. हा अपघात बीड- धामणगाव- नगर राज्य महामार्गावरील
सांगवी पाटण येथे पहाटे घडला.याबाबत माहिती अशी की,माऊली ट्रॅव्हल्सची एक बस (एम.एच,क्र.२२.३८६७ ) पुण्याहून ४० प्रवाशांना घेऊन बीडमार्ग नांदेडला जात होती.बीडहून अहमदनगरकडे एक ट्रक सुसाट वेगात जात होता.पहाटेच्या सुमारास बीड- धामणगाव- नगर राज्य महामार्गावरील सांगवीपाटण येथे ट्रकने हुलकावणी दिल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रोडलगत असलेल्या खड्ड्यात गेली.
नशीब बलवत्तर म्हणून ४० प्रवाशांचे प्राण वाचले,सुदैवाने या अपघातात कसलीही
जीवितहानी झाली नाही. ट्रॅव्हल्समधील सर्व
४० प्रवासी सुरक्षित आहेत. दरम्यान अपघात
झाल्यानंतर पहाटेच पर्यायी व्यवस्था करत
प्रवाशांना पुढे रवाना करण्यात आले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!