आष्टी(प्रतिनिधी)
पर्यावरण संतुलन अबाधित राखण्यासाठी मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनीरिंग सर्व्हिसेस लिमिटेड, मिटकॉन नेचर बेस्ड सोल्युशन्स व महोगनी विश्व अॅग्रो लिमिटेडच्या माध्यमातून महोगनी ला- गवड केलेल्या शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचा मोबदला मिळणार आहे. कृषी वनीकरण व पुनर्वनीकरण प्रकल्पाला वेरा रजिस्ट्री अंतर्गत यशस्वीरीत्या प्रमाणित केले आहे. या यशाचे सर्वत्र ठिकाणावरून कौतुक होत आहे.
महोगनी कृषि वानिकी हा प्रकल्प सध्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरात राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असून या पुढे शेतकऱ्यांना विविध पिकांद्वारे कार्बन क्रेडिट उप- लब्ध होईल. मिटकॉनची कृषी वनीकरण पद्धती पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत शेतीच्या विकासासाठी साहाय्यभूत ठरते. शेतकरी बंधूच्या सहकाऱ्यांने व्यावसायिक तत्वावर सहा हजार एकरवर महोगनी लागवड करण्यात आली आहे. मिटकॉनचा भारतातील महोगनी लागवड हा उपक्रम आंतरराष्ट्रीय स्वच्छ विकास यंत्रणा कार्यपद्धती मानकांचे अन- पालन करतो आणि मिटकॉनने जागतिक वृक्ष आधारित कार्बन क्रेडिट मार्केटमध्ये सहभागी होऊन शेतीचा शाश्वत विकास व शेतकरी आर्थिक सक्षमीकरणाचा पर्याय उपलब्ध केला आहे.