spot_img
spot_img

वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शब्दगंध चे फिरते वाचनालय चळवळ : प्रा डॉ किशोर धनवटे

नेवासा (वार्ताहार)- ‘आजच्या विविध प्रसारमाध्यमांच्या गर्दीत वाचनसंस्कृती लोप पावत असून शब्दगंधचे फिरते मोफत वाचनालय ती वृद्धींगत करण्यासाठी गावा गावात  प्रयत्न कारित आहे’ असे प्रतिपादन तालुका अध्यक्ष प्रा.डॉ.किशोर धनवटे यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य,शाखा नेवासा यांच्या वतीने फिरते मोफत वाचनालय उपक्रम  *नजिक चिचोंली* गावात घेतला तेंव्हा ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, वाचनाने मानसिक आरोग्य चांगले राहते. पुस्तके मनोरंजन तर करतातच पण चांगले विचार देतात,यासाठी वाचन महत्वाचे ठरते. जेष्ठ नागरिकांनी घरात वाचत बसल्यास पुढील पिढीवर त्याचे चांगले संस्कार घडतात. यामुळे विविध संतांची आधि केले मग सांगितले ही शिकवण निश्चित प्रचितीस येईल असे मत त्यांनी व्यक्त केले .
यावेळी शब्दगंधच्या नेवासा शाखेचे सल्लागार माजी प्राचार्य व कुलगुरू डॉ.अशोक ढगे हे प्रमुख पाहुणे म्हणून तर अध्यक्षस्थानी गावचे सरपंच श्री.भागचंद चावरे हे होतें. यावेळी बोलताना डॉ.ढगे म्हणाले की, एक पुस्तक जीवनात क्रांती घडवू शकते. यासाठी त्यांनी समाजसेवक आण्णा हजारे यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले की,वाचनाने ज्ञान वृद्धींगत होते, शुद्ध आचार, शुद्ध विचार व शुद्ध संस्कार मिळतात यासाठी शब्दगंधचे फिरते मोफत वाचनालय आपल्या दारात आले असून त्याचा फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी गावचे सरपंच भागचंद चावरे, चेअरमन  ईश्वर पाठक, ग्रामस्थ भागचंद चावरे , बाळासाहेब पाठक, गंगाधर पाठक, दिगंबर पाठक, मल्हारी पाठक, बहिरनाथ सोनपुरे, भिमराज पाठक, बाळासाहेब चावरे, आण्णासाहेब पाठक, काकासाहेब चावरे, सुभाष फाटके, मारुती धाडगे, बाळासाहेब गरड, लक्ष्मण धाडगे, विष्णू चावरे, बाबुराव चावरे, अंकुश पाठक, भिमराज पाठक व कृषी सहाय्यक श्री. भिमराज पाठक उपस्थित होते. शेवटी ग्रामस्थ श्री दिनंबर पाठक यांनी आभार प्रदर्शित केले .

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!