spot_img
spot_img

आ. बाळासाहेब आजबेंनी केली नियोजित उपजिल्हा रूग्णालयाच्या जागेची पहाणी आष्टी येथे आ. आजबेंच्या पाठपुराव्याने मंजुर झाले आहे उपजिल्हा रुग्णालय

आष्टी (प्रतिनिधी)- आष्टी विधानसभा मतदार संघात आ. आजबेंच्या प्रयत्नातून विविध विकासकामे मार्गी लागताना दिसत आहे. आष्टी येथे सुसज्ज सरकारी दवाखाना असावा अशी मागणी अनेक वर्षांपासुन तालुका वाशियांची होती. हि मागणी लक्षात घेऊन आ. बाळासाहेब आजबे यांनी सरकारकडे पाठपुरावा करून आष्टी येथे उपजिल्हा रुग्णालय मंजुर करून घेतले आहे. नियोजित रुग्णालयासाठी लागणाऱ्या जागेची त्यांनी आज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून योग्य त्या सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या असुन लवकरच अनुधिक पध्दतीचे उपजिल्हा रुग्णालय उभा राहणार आहे.
आष्टी विधानसभा मतदार संघात आ. बाळासाहेब आजबेंच्या माध्यमातून विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत. राष्ट्रीय खेळाडू सुवर्णपदक विजेता अविनाश साबळे यांच्या घरपर्यंतचा रस्ता यासाठी तब्बल चार कोटीचा निधी आ. आजबेंच्या प्रयत्नाने मंजुर झाला आहे. हा रस्ता कासारी पासुन ते साबळेंच्या घरापर्यंत चार किमी अंतराचा आहे. आष्टी तालुक्यातील रूग्णांना काही गंभीर दुखणे झाले तर त्या रुग्णाला नगर येथे उपचारासाठी दाखल करावे लागत आहे. रुग्णांची अडचण लक्षात घेऊन आ. बाळासाहेब आजबे यांनी आष्टी येथे सुसज्ज उपजिल्हा रूग्णालय व्हावे अशी मागणी सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणीनुसार छञपती संभाजीनगर येथे झालेल्या मंञी मंडळाच्या बैठकीत आष्टी येथे उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी मिळुन तब्बल चाळीस कोटी रूपयांचा निधीला मंजुरी देण्यात आली. लवकरच या कामाला प्रशासकीय मान्यता मिळेल. त्या अनुषंगाने संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नियोजित उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेची त्यांनी पहाणी केली असुन अधिकाऱ्यांना यावेळी योग्य सुचना दिल्या. नियोजित उपजिल्हा रुग्णालय हे सद्या आष्टी ग्रामीण रूग्णालयाच्या जागेत होणार आहे.
——————————
गंभीर रूग्णांना मिळणार उपचार

आष्टी तालुक्यातील गंभीर रूग्णांना उपचारासाठी अहमदनगर येथे दाखल करावे लागते. आष्टी येथे उपजिल्हा रूग्णालय झाल्यानंतर अनेक गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांना देखील आष्टी येथेच उपचार शक्य होणार आहेत. या रूग्णालय अत्याधुनिक सुविधा रूग्णांना येथे मिळणार आहेत. तसेच 11 ते 12 तज्ञ डाॅक्टर व 30 पेक्षा जास्त नर्स येथे रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. त्या रूग्णालय वेळेवर व चांगले उपचार येथे मिळणार आहेत.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!