पाथर्डी (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कोरडगाव येथे केंद्र व राज्य सरकारच्या योजनेतून मंजूर झालेल्या जलजीवन मिशन योजनेचे उद्घाटन व भूमिपूजन पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी पार पडले.
यावेळी ह भ प राम महाराज झिंजुर्के, (सद्गुरु जोग महाराज सेवा संस्थान आखेगाव), महंत पांडुरंग महाराज झुंबड, (भक्तीधाम सेवा संस्थान तोंडोळी), ह भ प लक्ष्मण महाराज भवार (रामलिंग सेवा धाम कळसपिंपरी), ह भ प लक्ष्मण महाराज भालेकर. (वै. विठ्ठल महाराज घुले संस्थान कोळसांगवी,) ह भ प नवनाथ महाराज राऊत.(वैष्णव आश्रम कोरडगाव) ह भ प नवनाथ महाराज वारंगुळे यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष रवींद्र उर्फ भोरू शेठ म्हस्के, संभाजीनगर येथील युवा सेना राज्य संपर्कप्रमुख( शिंदे गट) निलेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य प्रताप देशमुख, त्रिंबक देशमुख, अशोक कांजवणे, नागनाथ वाळके, अरुण मुखेकर, काकासाहेब देशमुख, स्वराज बोंद्रे, शंकर ससाने, युंनस शेख, प्रा शिवाजीराव हाडोळे, राहुल मस्के, विनायक देशमुख, अनिल ढाकणे, अनिल बंड, स्वप्निल देशमुख, रामभाऊ वाळके, प्रमोद काकडे, किसन देशमुख, मुरली काकडे, मल्हारी घुगरे बाळासाहेब घूगरे, भाऊसाहेब फुंदे, संदीप काकडे, प्रभाकर काकडे यांच्यासह कोरडगाव, मुखेकरवाडी आणि खंडोबा नगर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना सरपंच म्हस्के यांनी सांगितले की, कोरडगावसाठी मंजूर झालेल्या या योजनेमुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. या योजनेतून प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळेल असा विश्वास व्यक्त केला. या योजनेत गावासाठी एक विंधन विहीर, दहा एचपी चा सोलर पंप, एक पंप हाऊस, पाण्याच्या दोन टाक्या, गावांतर्गत नऊ किलोमीटरची पाईपलाईन, विहीर ते टाकी दीड किलोमीटरची मुख्य पाईपलाईन असे या योजनेचे स्वरूप आहे. दोन-तीन दिवसात प्रत्यक्षात कामाला सुरुवात होऊन सहा महिन्यात संपूर्ण काम पूर्ण होईल व प्रत्येक वाडी वस्तीवरील कुटुंबाला नळ कनेक्शन मिळेल. यावेळी उपस्थित मान्यवरांचा कोरडगाव ग्रामपंचायत च्या वतीने सन्मान करण्यात आला.