आष्टी:-(प्रतिनिधी ए बी कदम )
आष्टी तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने गेल्या १ वर्षांपासून सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील व निराधार, महिला,गोरगरीबांना मदत करून समाजसेवा करत आहेत. या अनुषंगाने आष्टीतील नवजिवन संगोपन केंद्रातील गोरगरीब, निराधार, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात मदत व्हावी फुल ना फुलाची पाकळी का होईना समजाचे आपण काहितरी देणे लागतो या सामाजिक भावनेतून दिपावली पाडव्याच्या निमित्ताने मंगळवार दि १४ नोव्हेंबर रोजी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले आहे.
आष्टी तालुक्यातील जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा सुवर्णाताई गि-हे, शहराध्यक्षा विद्याताई चव्हाण, सचिव वर्षाताई शिंदे, उपाध्यक्ष माधुरीताई तवले, रत्नमालाताई चाळक,मनिषाताई चवरे, छायाताई कदम, संजिवणीताई टाळके या आठ रणरागिणी ह्या दरवर्षी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करत असून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या जाणिवेतून रुग्णांना,अनाथ, निराधार,दिव्याग, महिला, होतकरू,गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करत आहेत.याच सामाजिक उद्देशाने आष्टी येथील नवजीवन संगोपन केंद्रातील
गोरगरीब व निराधार विद्यार्थ्यांना दिपावली पाडव्याच्या निमित्ताने फराळाचे वाटप करुन एक कौतुकास्पद उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी लक्ष्मणराव रेडेकर,प्रा आप्पासाहेब टाळके, तात्यासाहेब पोकळे,पत्रकार अविनाश कदम, संतोष नागरगोजे, महेश तवले व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष विकास मस्के यांनी केले.
————————————————————आम्ही सर्वोतोपरी कायम मदत करणार…
आष्टीतील नवजीवन संगोपन केंद्रातील गोरगरीब, निराधार विद्यार्थांना यापुढे ही आम्ही जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जी काही शैक्षणीक मदत लागेल ती आम्ही वेळोवेळी देऊ असे आश्वासन यावेळी बोलताना आष्टी तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा सुवर्णाताई गि-हे, शहराध्यक्षा विद्याताई चव्हाण यांनी दिले.