spot_img
spot_img

सय्यद साहिल यांची कृषी उपसंचालक पदी निवड

आष्टी(प्रतिनिधी) मानूर येथील गावचे सुपुत्र तसेच आष्टीच्या कृषी महाविद्यालयातून पदवी घेतलेले विद्यार्थी सय्यद साहिल यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे घेण्यात आलेल्या स्पर्धात्मक परीक्षेतून नेत्र दीपक यश संपादन केले असून त्यांची कृषी उपसंचालक तथा उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

आष्टी येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कृषी महाविद्यालयातून सय्यद साहिल यांनी कृषी पदवी चे शिक्षण पूर्ण केले आहे .अथक परिश्रम सचोटी व सातत्यपूर्ण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. त्यांना या मिळालेल्या यशाबद्दल मा.आमदार भीमराव धोंडे यांनी कृषी महाविद्यालय आष्टी येथे त्यांचे मिळालेल्या यशाबद्दल सय्यद साहिल यांचा सत्कार केला तर याप्रसंगी आष्टी तील पत्रकार जावेद पठाण शेख निसार संतोष नागरगोजे इंजिनिअर फारूक सय्यद यांनी ही सय्यद साहिल व त्यांचे वडील व जमील सय्यद यांचा सत्कार केला . सय्यद साहिल ने मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!