देवळाली (प्रतिनिधी )आष्टी तालुक्यातील देवळाली येथे यावर्षी प्रथमच भैरवनाथ क्रिकेट क्लब च्या वतीने सरपंच चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दिवाळीच्या सुट्यांमध्ये या स्पर्धेचे आयोजन केल्याने मोठ्या प्रमाणात संघाने सहभाग नोंदवला आहे देवळाली,कडा,घाटा पिंपरी, लोखंडवाडी, खरकटवाडी, आल्हणवाडी, चितळवाडी, धामणगाव ,दादेगाव ,गहूखेल, खिळद, वाघदरा,नेवासा,डोंगरगण या गावांच्या संघानी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे या स्पर्धेमध्ये देवळाली गावचे सरपंच पोपट शेकडे यांच्या वतीने 21 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक, तर हरीभाऊ तांदळे(माजी सरपंच) यांचे द्वितीय पारितोषिक 15,555 आहे माजी सरपंच शैलेश मोहिते यांच्या वतीने 7777 तिसरे बक्षीस ठेवण्यात आले आहे या स्पर्धेसाठी भैरवनाथ क्रिकेट क्लब च्या वतीने बहारदार नियोजन हे करण्यात आले आहे स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी रविंद्र नागरे, नितीन घुले,बंडु टकले,बाळु तांदळे,राजु तांदळे,दत्तु टकले यांच्याशी संपर्क करावा या स्पर्धेसाठी कृष्णा शेकडे व ज्ञानेश्वर तांदळे यांचे विशेष सहकार्य लाभलं आहे या स्पर्धेला शुक्रवार दिनांक १० रोजी सरपंच पोपट आबा शेकडे, सरपंच मनोज गाढवे, सरपंच मोहन आमटे, सरपंच प्रल्हाद मुळीक, उद्योजक भागचंद झांजे,उपसरपंच राजेंद्र पवार, उपसरपंच अमोल तळेकर, संदिप शिंदे,राजु तळेकर,माजी सरपंच हरीभाऊ तांदळे, माजी सरपंच शैलेश मोहिते, दिलीप तांदळे, अमोल तळेकर,कृष्णा तांदळे,पत्रकार शरद तळेकर पत्रकार अतुल जवणे ग्रा. पं. सदस्य काकासाहेब कटके,गणेश खाडे, विजय आमले,बाळू तांदळे,विजय नागरे, दिपक पवार यांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा पार पडला यावेळी भैरवनाथ क्रिकेट क्लबच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.