आष्टी (प्रतिनिधी)ज्याप्रमाणे राज्य शासन गोरगरीब उपेक्षित घटकांना, दिवाळीनिमित्त आनंद शिधा चे वाटप करतात, त्याचप्रमाणे देऊळगाव घाट लमानतांडा येथे. आदिनाथ ठोंबरे यांनी त्यांच्या वडिलांच्या म्हणजे माणिक दत्तू ठोंबरे यांच्या स्मरणार्थ जयदत्त शिधा.वर्ष पहिले चे वाटप कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, शामा आबा तळेकर, व माजी जिल्हा परिषद सदस्य राऊसाहेब आण्णा शिरसाठ, यांच्या हस्ते करण्यात आले.
या जयदत्त शिधा. मध्ये साखर रवा मैदा आणि तूप इत्यादी वस्तूचा समावेश आहे. या स्तुत्य उपक्रमामुळे गोरगरिबांची दिवाळी गोड होण्यास मदत होणार आहे.
यावेळी निलेश शिरसाट सर, गावचे सरपंच रामकिसन ठोंबरे, रमेश पवार ,संभाजी मस्के, योशेफ सूर्यवंशी, राज पठाण, अतुल म्हस्के ,मोहन ठोंबरे शिवाजी मस्के व तांड्यातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.