आष्टी (प्रतिनिधी )आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल घडवू शकेल असा असणारा खुंटेफळ साठवण तलावाच्या कामाबाबत मी केलेल्या पाठपुराव्यासंबंधीची (नस्ति) फाईल लवकरच आपणासमोर ठेवून खुंटेफळ साठवण तलाव या योजनेतील मुर्गा कोण ? आणि फकीर कोण ? आणि अंडा कोण खात आहे ? हे जनता व पत्रकारांसमोर लवकरच मांडणार आहे .असा पलटवार आ. सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.
आष्टी येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आ.बाळासाहेब आजबे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खुंटेफळ साठवण तलाव जलवाहिनी कामाच्या टेंडर बाबत आ.सुरेश धस यांचे वर ” मेहनत करे मुर्गा और अंडा खाये फकीर ” अशी टीका केली होती. त्यावर पलटवार करतानाते पुढे म्हणाले की,सध्या दिवाळी हा सण असल्यामुळे आपण सर्वांनाच शुभेच्छा देत आहोत दिवाळी सण साजरा केल्यानंतर आपण खुंटेफळ साठवण तलाव या योजनेबाबतच्या फाईल (नस्ति ) ची सत्यप्रत मागवण्यासाठी अर्ज केलेला आहे त्या नुसार संबंधित दस्तऐवज प्राप्त होताच आपण पुन्हा एक पत्रकार परिषद आयोजित करून या खुंटेफळ साठवण तलावासाठी केलेल्या पाठपुराव्या संबंधी केलेला पत्रव्यवहार पत्रकारांसमोर सादर करून वस्तुस्थिती समोर आणणार आहोत
या तलावाच्या सर्वेक्षणापासून ते मंजुरी पर्यंत आपण स्वतः शासन दरबारी प्रयत्न केलेले असून आ.बाळासाहेब आजबे यांनी या कामासाठी काय काय केले आहे ? ते सांगावे माझ्या पत्रानंतरच या कामासंबंधीची फाईल पुढे सरकली असून नंतरच कार्यवाही झालेली आहे यासंबंधीचे दस्तऐवज प्राप्त करत असून आ. बाळासाहेब आजबे यांनी त्यांचे कडील पाठपुरावा केल्यासंबंधीचे दस्तऐवज दाखवावेत त्यानंतरच त्यांनी याबाबत बोलणे योग्य होईल असे सांगून शिंपोरा ते थेट खुंटेफळ साठवण तलावासाठीच्या जलवाहिनीच्या कामाचे टेंडर आ.बाळासाहेब आजबे यांनी ईपीसी पद्धतीने टेंडर निघावे अशी मागणी केली होती .ती रद्द होऊन माझ्या मागणीप्रमाणे या जलवाहिनी कामाचे बी-1 पद्धतीने टेंडर काढण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली