spot_img
spot_img

छत्रपती संभाजीनगर येथे आ.सुरेश धस यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट

आष्टी (प्रतिनिधी)
मराठा आरक्षण प्रश्नावर लढणारे मराठा समाजाचे लढवय्या नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांना आठ दिवसांच्या उपोषणानंतर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्यामुळे गुरुवार दि.९ नोव्हेंबर रोजी आ.सुरेश धस यांनी त्यांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली.
विधानपरिषदेचे आ.सुरेश धस यांनी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे पाहून आनंद झाला असल्याची भावना भेटी दरम्यान आ.धस यांनी व्यक्त केली.
मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाने मागणी केल्याप्रमाणे आणि सरकारने शब्द दिल्याप्रमाणे मराठा आरक्षणासाठी गठित केलेल्या समितीला नोंदणी कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय व महसूल कार्यालयांमध्ये मराठा समाजाच्या ‘कुणबी’ म्हणून नोंदी आढळत आहेत ही मराठा समाजाच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे. प्रकृतीची विचारपूस करून मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी सविस्तर चर्चा करत जरांगे पाटील यांना आ.सुरेश धस यांनी काळजी घेण्याची विनंती केली.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!