spot_img
spot_img

जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार राज्य स्तरावर देण्यात येणार – डॉ. बाबासाहेब मुटकुळे

बीड(प्रतिनिधी) मराठा सेवा संघ प्रणित तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारे जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार हे राज्य स्तरावर देण्यात येतील अशी माहिती मराठा सेवा संघाचे प्रवक्ते प्रा.डॉ. बाबासाहेब मुटकुळे यांनी दिली. त्यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दिनांक 07ऑक्टोबर 2025 रोजी आष्टी तालुका मराठा सेवा संघ व तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेची संयुक्त बैठक इंजि. तानाजी जंजिरे (बापू) यांच्या अध्यक्षतेखाली होऊन वरील प्रमाणे निर्णय झाला. त्याचप्रमाणे या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2025 ही ठेवण्यात आली. या बैठकीस सर्व शिवश्री इंजि. प्रल्हाद तळेकर, लक्ष्मण रेडेकर, भास्करराव निंबाळकर, बन्सीधर मोरे, डॉ.बाबासाहेब मुटकुळे, प्राचार्य शशिकांत कन्हेरे, सुरेश पवार सर, ॲड सीताराम पोकळे, पत्रकार दादा पवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठा सेवा संघ ही छत्रपतींच्या मावळ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय (जागतिक) पातळीवर 35 वर्षापासून काम करणारी संस्था आहे .या संस्थेअंतर्गत तानूबाई बिरजे पत्रकार परिषद काम करत आहे.जिजाऊ पुरस्कारासाठीचे प्रस्ताव स्वीकारताना तो प्रस्ताव परिपूर्ण असावा अशी अपेक्षा आहे.
पुढे बोलताना डॉ.मुटकुळे म्हणाले की, तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेतर्फे महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिजाऊ माँसाहेब पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे .सामाजिक स्वास्थ्य सुदृढ राहावे व आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे म्हणून सदरचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्माचे व्यक्ती या पुरस्कारासाठी पात्र राहतील.
हे पुरस्कार सामाजिक कार्य, कृषी, वैद्यकीय, पशुवैद्यकीय, अभियांत्रिकी, अध्यात्म ,शिक्षण, पत्रकारिता, राजकीय, विधी व न्याय विभाग ,महिला व बालकल्याण, उद्योग व्यवसाय, संगीत या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणार आहेत. याशिवाय उत्कृष्ट प्रशासक, आदर्श ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, बालवाडी सेविका, आशा वर्कर, वायरमन, कृषी सहाय्यक, सरपंच या ग्राउंड लेव्हलला काम करणाऱ्या नोकरदारांनाही आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
इच्छुकांनी आपापले प्रस्ताव ,अल्प परिचयासह ,स्वतः किंवा सूचकामार्फत दिनांक 25 ऑक्टोबर 2025 पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावेत. प्रस्तावांमध्ये आपले नाव ,गाव ,शिक्षण, कोणत्या क्षेत्रात काम करत आहात ?कोणत्या क्षेत्रात पुरस्कार पाहिजे आहे? याची माहिती, केलेल्या सामाजिक कार्याची माहिती ,यापूर्वी मिळालेल्या पुरस्कारांची माहिती, व सन्मानपत्राच्या स्वतः साक्षांकित केलेल्या प्रति याचा समावेश असावा. व्यावसायिक असाल तर वडिलोपार्जित व्यवसाय आहे काय ?किंवा स्वतः सुरू केलेला आहे. याबाबत माहिती द्यावी. तसेच व्यवसायात केलेली प्रगती, स्थैर्य व कौटुंबिक माहिती सुद्धा द्यावी. समाजासाठी केलेल्या कामाची माहिती द्यावी .निव्वळ समाज सेवा करीत असाल तर उदरनिर्वाहाचे साधन वगैरे माहिती द्यावी. ही संपूर्ण माहिती प्रस्तावासह शिवश्री ॲड सीताराम त्रिंबकराव पोकळे पत्रकार , रा. बेलगाव ,ता. आष्टी, जिल्हा बीड, पिन 41 42 08, मो.94 21 63 80 55, या पत्त्यावर पाठवावी. *सोशल मीडियावरील प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत*. अधिक माहितीसाठी वरील क्रमांकावर फोन करावा ,असे आवाहन शेवटी प्रा. डॉ. मुटकुळे यांनी केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!