spot_img
spot_img

बालमटाकळी ग्रामपंचयतीवर राष्ट्रवादीचा सरपंचपदी झेंडा…..! बालमटाकळी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बालंबिका ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय….!

शेवगाव/प्रतिनिधी ( इसाक शेख )

शेवगाव तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल सोमवार दि. ६ रोजी लागला असून यामध्ये तालुक्यातील मोठ्या चुरशीने झालेल्या तसेच राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बालमटाकळी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बालंबिका ग्रामविकास परिवर्तन पॅनल व भारतीय जनता पार्टीच्या जनक्रांती विकास पॅनलच्या चुरशीच्या झालेल्या लढतीत राष्ट्रवादीच्या बालंबिका ग्रामविकास परिवर्तन पॅनलने सरपंच पदासाठी १ तर १३ ग्रामपंचायत सदस्यापैकी १० सदस्यांच्या जागा जिंकत दणदणीत असा विजय मिळवून ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे. तर भारतीय जनता पार्टीला सदस्य पदाच्या १३ जागेपैकी ३ जागेवर समाधान मानावे लागले असून सरपंचपदी राष्ट्रवादीचे डॉ. राम भीमराव बामदळे यांना २०३२ मते मिळून हे भरघोस मतांनी विजयी होऊन निवडून आले असून सदस्य पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित बालंबिका ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :- सरपंचपदी डॉ. राम भीमराव बामदळे यांना २०३२ मते मिळून ( विजयी ), मिळाली तर सदस्यपदी प्रभाग क्रमांक १ मधून विक्रम सुधाकर बारवकर ४८२ मते मिळून ( विजयी ) , माया दिलीप भोंगळे ५५९ मते मिळून ( विजयी ), अरुणाबाई सर्जेराव घोरपडे ५४४ मते मिळून ( विजयी ), प्रभाग क्रमांक २ मधून कैलास आबासाहेब पौळ ४९३ मते मिळून ( विजयी ), विठ्ठल मोहनराव देशमुख ४४३ मते मिळून ( विजयी ), महेमूदाबी इसुब शेख ५११ मते मिळून ( विजयी ), प्रभाग क्रमांक ३ मधून गणेश रायभन शिंदे ४४७ मते मिळून ( विजयी ), सोनाली शाम राजपुरे ४७० मते मिळून ( विजयी ), प्रभाग क्रमांक ५ मधून सुवर्णा महेश घरगणे ३१६ मते मिळून ( विजयी ), तर बिस्मिल्ला मगबुल शेख ३०२ ( विजयी ) मते मिळाली आहे. तर भारतीय जनता पार्टी प्रणित तुषार वैद्य यांच्या जनक्रांती विकास पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :- प्रभाग क्रमांक ४ मधून रेखा सोमनाथ धोंगडे ३२६ मते मिळून ( विजयी ), संगीता दुर्योधन काळे ३६२ मते मिळून ( विजयी ), तर प्रभाग क्रमांक ५ मधून ज्ञानेश्वर नामदेव वैद्य ३०६ मते मिळून ( विजयी ) मिळाली आहे. तर राष्ट्रवादी पक्षाने निवडून आलेल्या सरपंच उमेदवारासह सदस्य पदाच्या १० उमेदवारांची गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक मोहनराव देशमुख, चंद्रकांत गरड, हरिचंद्र घाडगे, युवा नेते कमुभाई शेख, कासमभाई शेख, अशोकराव खिळे, रोहिदास भोगले, अशोक वाघुंबरे, रमेश शिंदे, प्रशांत देशमुख, युवा उद्योजक पांडुरंग नवले, बादशाह शेख, गजानन देशमुख, भारतराव घोरपडे, भाऊसाहेब बामदले, सत्तार शेख यांच्या सह आदी ग्रामस्थ तसेच कार्यकर्ते, गावकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!