आष्टी (प्रतिनिधी) “दु:खात असलेल्या माणसाला आधार देणं, हेच खरं देवपूजेचं काम आहे,” — या भावनेला मूर्त रूप देत आष्टी तालुक्यात गेल्या दोन दशकांपासून ‘रुग्णसेवा’ हेच आपले ध्येय मानून काम करणारे समाजसेवक विकास साळवे यांनी हजारो रुग्णांना जीवनदान दिलं आहे.
मराठवाडा भूषण, लोकनेते आ. सुरेश धस यांच्या प्रेरणेतून आणि माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याला नवा आयाम दिला आहे.
गोर-गरीब, शेतकरी, मजूर, कामगार, आजारपणाच्या चक्रात सापडलेल्या कुठल्याही रुग्णाला मदत मिळावी म्हणून विकास साळवे हे नेहमी रात्री कितीही वाजता आ.सुरेश धस यांचा फोन आला की तात्पुरतेने पोहोचतात. आणि त्या रुग्णांची मदत करतात. मुख्यमंत्री सहायता निधी, पीएम निधी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (आयुष्यमान भारत), माझी कुटुंब माझी जबाबदारी, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अत्यंत तत्परतेने काम केलं आहे.
आ.सुरेश धस यांच्या अथक प्रयत्नांतून आतापर्यंत अनेक रुग्णांचे महागडे ऑपरेशन, हृदयविकार, किडनी, कर्करोग व व्हेंटिलेटर आवश्यकता असेलच तर आम्ही सोय करतात धर्मदाय रुग्णालयात बेड सवलती फायदा करून देतो गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना आर्थिक मदत मिळाली आहे. काही जणांना वेळेवर रक्त, औषधे, आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देत त्यांच्या कुटुंबाचे आयुष्य बदलले आहे. आ. सुरेश धस यांच्या माणुसकीच्या स्पर्शाने आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही रुग्णसेवा मोहीम केवळ एक उपक्रम न राहता “माणुसकीचा श्वास” बनली आहे.आ. धस यांच्या “जनतेसाठी, जनतेच्या मनातून” या कार्यपद्धतीचा परिणाम म्हणून आज हजारो कुटुंबे आ.धस यांच्या नावाने कृतज्ञतेने स्मरण करतात.
रुग्णसेवक विकास साळवे व दता हुले, सोमनाथ कोल्हे, अमर वाळके,सुशील ढोले,प्रतिक काळे या टीमच्या माध्यमातून दर आठवड्याला शेकडो रुग्ण बरे होतात, रुग्णांना शासकीय मदतीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जाते, हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य दिलं जातं. विकास साळवे यांचे हे कार्य आज अनेक सामाजिक संघटनांसाठी आदर्शवत उदाहरण ठरत आहे.
“रुग्णसेवा हीच खरी देशसेवा” हे वाक्य विकास साळवे यांनी केवळ उच्चारलेलं नाही, तर ते जगून दाखवलं आहे. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीला आ. सुरेश धस यांचे प्रोत्साहन आणि आधार लाभत असून आज मराठवाड्यातील जनतेच्या आशेचा दीपस्तंभ बनली आहे.