spot_img
spot_img

आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नाने १०० रुग्णांना ८२ लाखांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत *********************************** ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ आ.धस यांच्या माध्यमातून अमर वाळके यांची उल्लेखनीय कामगिरी

आष्टी (प्रतिनिधी) “दु:खात असलेल्या माणसाला आधार देणं, हेच खरं देवपूजेचं काम आहे,” या भावनेला साकार करत मराठवाडा भूषण, लोकनेते आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नाने आणि प्रेरणेने ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ या ग्रुपने गेल्या एका वर्षात समाजात एक आदर्श निर्माण केला असून या कालावधीत या ग्रुपच्या माध्यमातून १०० रुग्णांना तब्बल ₹८२ लाखांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व विविध शासकीय योजनांमधून मिळवून देण्यात आली.
ही मदत फक्त आर्थिक नव्हे, तर प्रत्येक रुग्णाच्या जीवनात पुन्हा आशेचा किरण निर्माण करणारा आ.सुरेश धस यांचा संवेदनशील प्रयत्न ठरला आहे.
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ ग्रुपचे कार्यकर्ते रुग्णसेवक अमर वाळके हे रुग्णांच्या उपचारासाठी लागणारी कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, शासकीय योजना, तसेच वैद्यकीय सल्ला या सर्व टप्प्यांवर रुग्णांच्या सोबत राहून मार्गदर्शन करतात. त्यामुळे शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत पोहोचवण्यात या उपक्रमाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या कार्याची प्रेरणा फक्त आणि फक्त आमदार सुरेश धस यांच्या “जनतेसाठी सदैव तत्पर” या कार्यपद्धतीतून मिळाली असल्याचं ग्रुपचे कार्यकर्ते सांगतात.

➡️ रुग्ण सेवक अमर वाळके म्हणाले,गेल्या वर्षभरात आमच्या ग्रुपने १०० रुग्णांना मदतीचा हात दिला आणि शासन योजनांमधून ८२ लाखांची थेट आर्थिक मदत मिळवून दिली. या सेवाभावी प्रवासात मला थोडं का होईना आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली योगदान देता आलं, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.” या उपक्रमामुळे आष्टी मतदारसंघात सामाजिक बांधिलकीची परंपरा अविरत चालू आहे.गरजू रुग्णांना नवसंजीवनी देण्याचं काम ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ ग्रुप सातत्याने करत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!