मुंबई (प्रतिनिधी) :- इंटरनॅशनल ग्लॅम आयकॉन अवॉर्ड हा सुनीता भगत यांनी मुंबई येथे रेडिसन हॉटेल येथे 2 नोव्हेंबर रोजी आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती म्हणून ऍक्टर तुषार कपूर हे होते . कार्यक्रमांमध्ये विदेशातील युवक – युवती सहभागी झाले होते.
सविस्तर माहिती असी की, या विदर्भातून आदिवासी भागातील गडचिरोली जिल्ह्यातील अडपल्ली गावातील तळागाळातील घटकांपर्यंत कार्य करत असलेल्या ईशान्य भोयर या युवकाला तुषार कपूर यांच्या हस्ते अवाॅर्ड प्रदान करण्यात आला.
कोणते प्रसिद्धी न करता अनेक सामाजिक कामे ईशान्य भोयर हे करत असतात. हजारो कुटुंबांना राशन व किरण वाटप किट, विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य, दिवाळी अंतर्गत हजारो उपेक्षीतांना दिवाळी फराळ वाटत, मुलांना शिक्षणासाठी मदत, शासकीय रुग्णालयात फळे वाटप यांसारख्या अनेक उपक्रम ते राबवतात.
या अगोदर त्यांना मॉडेलिंग क्षेत्रात विविध अवाॅर्ड मिळाले आहेत. सामाजिक क्षेत्राबरोबर मॉडेल क्षेत्रातील त्यांनी उंच भरारी घेतली आहे .इंटरनॅशनल ग्लॅम अवॉर्ड व सन्मान चिन्ह देऊन अभिनेता तुषार कपूर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सर्व सामान्य कुटुंबातील ईशान्य भोयर या युवकांनी इंटरनॅशनल अवाॅर्ड पर्यंत मजल मारल्याने याबद्दल परिसरातून सर्वत्र त्यांचे कौतुक आणि अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
• आई-वडिलांनी खूप कष्ट करून ईशान्यभर यांचे शिक्षण पूर्ण केले असून त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून आयुष्य घडवत आहेत.
• आदिवासी भागातील रहीवासी असणाऱ्या युवकाला इंटरनॅशनल गेम अवाॅर्ड मिळाला. भारतातुन त्यांची दुसऱ्या क्रमांकावर निवड झाली.ही अभिमानाची गोष्ट आहे.
• आई शेती व वडील क्लर्क म्हणून कार्यरत आहेत. ईशान्य भोयर आपले शैक्षणिक क्षेत्र व सामाजिक क्षेत्र पाहून आईला ही शेती व्यवसायात मदत करतात.
• त्यांचे बीएससी , एमएससी, बीएड उच्च शिक्षण झाले असून ते खाजगी क्लासेस मध्ये शिकवणी करतात. मॉडेलिंग क्षेत्रातील त्यांना विविध आवाॅर्ड मिळाले आहेत.