spot_img
spot_img

धानोरा महाविद्यालयाच्या चिराग शिंगाडे याची बुद्धिबळ विभागीय स्पर्धेसाठी निवड

आष्टी (प्रतिनिधी)- शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा (ता आष्टी) येथील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीचा विद्यार्थी चिराग शिंगाडे याची शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी हिंगोली येथे होणाऱ्या विभागीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
धानोरा येथील कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी यावर्षीही विविध स्पर्धेमध्ये बाजी मारली आहे. या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. चिराग शिंगाडे याने यापूर्वीही अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. बुधवार दि ८ ऑक्टोबर रोजी बीड येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
चिराग शिंगाडे याच्या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब, प्रशासन अधिकारी शिवदास विधाते, डॉ.डी बी राऊत, माऊली बोडखे, संजय शेंडे, प्रा. डॉ सागर वाघुले, प्रा संदीप ननवरे, सिनेट सदस्य डॉ अजय दादा धोंडे, अभयराजे धोंडे,
प्राचार्य भगवान वाघुले, उपप्राचार्य गहिनीनाथ एकशिंगे, स्टाफ सेक्रेटरी प्रा. निसार शेख, प्रा रत्नमाला तरटे, प्रा शबाना शेख, प्रा राजू शेलार, प्रा सुभाष मोरे, प्रा आजिनाथ गिलचे, प्रा राजेंद्र मिसाळ, प्रा ज्ञानदेव बोडखे, प्रा विवेक महाजन, प्रा आतेश बनसोडे, प्रा गोरक्षनाथ वाळके, प्रा सतीश तागड, प्रा नितीन बाळशंकर, प्रा डॉ उस्मानखा पठाण, प्रा डॉ सुभाष नागरगोजे, प्रा अंजना गिरी, प्रा अमर शेख, प्रा डॉ संजय झांजे, प्रा अम्रीत ज्ञानेश्वर, कार्यालयीन अधीक्षक म्हसू अरुण आदींनी शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी हिंगोली येथे होणाऱ्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी चिराग याचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या. चिराग शिंगाडे याला शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा डॉ सुभाष नागरगोजे, उपप्राचार्य गहिनीनाथ एकशिंगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!