आष्टी (प्रतिनिधी) मराठवाडाभूषण लोकनेते आ.सुरेश अण्णा धस यांच्या शेतकरी हिताच्या लढ्याला सलाम करावा असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाने घेतला आहे
याबाबत चे सविस्तर वृत्त असे की,
अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या. मातीतून उपजीविका करणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झाले. या संकटाकडे पाहून लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस यांनी राज्यात सर्वप्रथम पुढाकार घेऊन, अशा जमिनींना “मनरेगा” योजनेत समाविष्ट करून शेतकऱ्यांना मदत देण्याची ठोस आणि व्यवहार्य मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे केली होती.
या ऐतिहासिक आणि शेतकरीहिताच्या मागणीची मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेत मनरेगा योजनेतून हेक्टरी ₹३ लाख आणि राज्य शासनाकडून अतिरिक्त ₹४७ हजार, अशा एकूण ₹३ लाख ४७ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. हा निर्णय म्हणजे खरडून गेलेल्या जमिनींना पुनर्जीवन देणारा दिलासा ठरणार आहे.
याशिवाय, NDRF च्या विद्यमान दोन हेक्टर मर्यादेच्या पुढे जाऊन मुख्यमंत्री महोदयांनी तीन हेक्टर क्षेत्रपर्यंतच्या शेतजमिनींना मदतीस पात्र करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कडी, सीना, सिंदफणा, मांजरा आणि राज्यातील इतर छोट्या-मोठ्या नदी खोऱ्यांतील शेतकरी वर्गाला थेट लाभ होणार आहे.
तसेच, बुजलेल्या विहिरींमधील गाळ काढण्यासाठी ₹३० हजार रुपयांची विशेष तरतूद, शेतीपयोगी जलस्रोत पुनर्संचयित करण्यासाठी केली गेली आहे.
या सर्व उपाययोजनांसाठी शासनाने एकूण ₹३१६२८ कोटी रुपयांचे भरीव पॅकेज जाहीर केले आहे — जे मागील काही वर्षांतील सर्वांत मोठं शेतकरीहिताचं पॅकेज मानलं जात आहे.
शेतकऱ्यांच्या समस्येकडे दूरदृष्टीने पाहून, त्यासाठी राज्याच्या सर्वोच्च पातळीवर आवाज उठवून ठोस निर्णय घडवून आणणारे आ. सुरेश आण्णा धस हे खरं तर कष्टकरी समाजाचे खरे प्रतिनिधी आहेत.
त्यांच्या प्रयत्नांमुळे केवळ शिरूर (कासार) मतदारसंघातीलच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या दुःखाकडे केवळ सहानुभूतीने नव्हे तर कृतीने पाहणारा नेता म्हणजेच लोकनेते सुरेश अण्णा धस!
त्यांच्या या प्रयत्नाबद्दल कष्टकरी समाजमन, शेतकरी वर्ग आणि जनतेच्या मनात प्रचंड कृतज्ञता व्यक्त होत आहे.
लोकनेते आ. सुरेश आण्णा धस यांच्या शेतकरीहिताच्या लढ्याला सलाम!