आष्टी (प्रतिनिधी) आष्टी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जेद्वारे सातत्यपूर्ण आणि शाश्वत वीजपुरवठा मिळावा, या उद्देशाने आमदार सुरेश धस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत दोन प्रमुख उपकेंद्रांवर 5 MVA क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आले आहेत.शेतकरी व नागरिकांतून आनंद उत्सव साजरा करत राज्य सरकार व आ.सुरेश धस यांचे आभार मानले.
या मंजुरीनंतर रोहतवाडी 33 के. व्ही. उपकेंद्र, रोहतवाडी आणि 33 के. व्ही. उपकेंद्र, डोंगरकिन्ही येथे कामे मोठ्या वेगाने सुरू झाली आहे.या कामांमुळे शेतकऱ्यांना दिवसाच्या वेळेत सौर ऊर्जेद्वारे शेती सिंचनासाठी स्थिर, विश्वासार्ह आणि शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. यामुळे शेती उत्पादनात वाढ, ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळेल. या यशाबद्दल बोलताना आमदार सुरेश धस यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण आणि ऊर्जेच्या स्थिर पुरवठ्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. या दोन उपकेंद्रांच्या मंजुरीमुळे मतदारसंघातील अनेक गावांना दीर्घकालीन लाभ होणार असून हे काम म्हणजे शेतकऱ्यांसाठी मिळवलेले एक ठोस यश आहे.
रोहतवाडी उपकेंद्रांतर्गत नायगाव, रोहतवाडी,जवळला,थेरला, करंजवन, डोंमरी,कोल्हेमानेवस्ती,भुसारनारवाडी, तिरमलावाडी, भगताचे कोठे,घाटेवाडी, वडझरी,हनुमानवाडी, मळफाचीवाडी,पिठ्ठी, उखांडा या गावांचा समावेश आहे, तर डोंगरकिन्ही उपकेंद्रांतर्गत डोंगरकिन्ही, नाळवंडी, जाटनांदूर, मळेकरवाडी, मांडवेवाडी, तुपेवाडी,मुंजारवस्ती,मिसाळवाडी,मोरजळवाडी, भाटेवाडी, कारेगाव, पोटेवाडी,भराटवाडी, जाधववाडी,घोळेवाडी,सवसवाडी,मदमापुरी आणि जेबेवाडी ही गावांना फायदा होणार होणार आहे.या योजनेच्या माध्यमातून आष्टी विधानसभा मतदारसंघात सौर ऊर्जेवर आधारित कृषी क्रांती घडविण्याकडे एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याचे शेतकरी व स्थानिक नागरिकांकडून भावना व्यक्त होत आ.सुरेश धस यांचे आभार मानले जात आहे.