spot_img
spot_img

विजयादशमी मुहूर्तावर नवीन मच्छिंद्रनाथ मंदिराचा शीला रोहन कार्यक्रम संपन्न.. नाथ भक्तांनी सढळ हाताने मदत करण्याचे – आ.सुरेश धस यांचे आवाहन

आष्टी (प्रतिनिधी) साडेतीन मुहूर्तांपैकी अत्यंत मंगल असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर श्री.क्षेत्र मच्छिंद्रनाथगड मायंबा येथील नवीन दगडी मंदिर बांधकामाच्या शीला रोहनाचा शुभारंभ देवस्थानचे विश्वस्त आ. सुरेश धस यांचे हस्ते करण्यात आला
या वेळी मदन महाराज देवस्थानचे अध्यक्ष हरिभक्त परायण बबन महाराज भैरवाल मच्छिंद्रनाथ देवस्थानचे अध्यक्ष सचिव विश्वस्त माजी आमदार साहेबराव दरेकर, अ.भा.किसान संघाचे नीलेश चिपाडे,विश्वस्त ताठे आदि उपस्थित होते.. या नियोजित भव्य दिव्य नाथ समाधी मंदिराचे बांधकाम देगलूर परिसरातील उच्च दर्जाचा दगड वापरण्यात येणार आहे .. हा शीलारोहनाचा कार्यक्रम संत,महंतांच्या उपस्थितीत संपन्न झाला..
यावेळी दानशूर नाथ भाविक भक्तांनी या मंदिराच्या कामासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन आ.सुरेश धस यांनी केले आहे.
यावेळी बोलताना आ.धस यांनी या मंदिर बांधकामाचा अपेक्षित कालावधी साडेतीन वर्ष एवढा असून या संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या मंदिराच्या उभारणीसाठी सुमारे ७२ कोटी रूपये इतका खर्च अपेक्षित असून मंदिरासाठी लागणारे दगड देगलूरहुन आणले जात असल्याचे सांगितले.त्याला घडवणे व बसविणे याची किंमत गृहीत धरून या शिलेचा आकार आणि किंमत वेगळी राहणार असून भाविक भक्तांनी या प्रति शीला संख्या निश्चित करून आपला सहभाग नोंदवावा याविषयीची अधिक माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल असे सांगत आत्तापर्यंत काही भक्तांनी हजारो सिमेंटच्या गोण्या, तर काहींनी लाखो रुपयांची देणगी देऊन सहकार्य केले आहे केले आहे. या मंदिराचा पाया १००x१५० फूट एवढा असून, १०९ फूट उंच कळसावर नाथ संप्रदायाचा भगवा ध्वज फडकणार असून या कामासाठी नाथभक्तांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन सुरेश धस यांनी केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!