आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील अनिषा ग्लोबल इंग्लिश स्कूल, जामगाव रोड येथे नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान अंतर्गत मोफत नेत्र विकार निदान, उपचार व शस्त्रक्रिया भव्य शिबिराचे आ.सुरेश धस यांच्या आयोजनात तर लातूरचे धर्मादाय सहआयुक्त राजेशजी सासने यांच्या हस्ते तर बीडचे धर्मादाय उप आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
शिबिरामध्ये नेत्र तपासणी,चष्म्याचा नंबर तपासणी तसेच मोतीबिंदू तपासणी यासह महत्त्वपूर्ण वैद्यकीय तपासण्या पार पडल्या. रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या भव्य नेत्र तपासणी शिबिरात १५१८ रुग्णांनी लाभ घेतला असून आनंदऋषिजी नेत्रालय, अहिल्यानगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी संपूर्ण तपासणी शिबिरात आपले अमूल्य सहकार्य केले.
यावेळी बोलताना आ.धस म्हणाले,आपले यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी “नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान” ही योजना राबवून ग्रामीण व सर्वसामान्य रुग्णांच्या जीवनात खऱ्या अर्थाने उजेड निर्माण करण्याचे कार्य केले आहे. केंद्र सरकारच्या या उपक्रमाचा थेट लाभ आज हजारो रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रियेद्वारे होत असल्याचे प्रत्यक्ष अनुभवता आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गरीब रुग्णांप्रति संवेदनशील आहेत,ते जमेल तसे मदत करतात. प्रधानमंत्री योजनेतून रुग्णांसाठी ३ ते ५ लाख रुपयांची मदत मिळते त्या योजना गरजू लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम करू. काही जबाबदाऱ्या समाजाला देखिल घ्याव्या लागतात सगळ सरकार अवलंबून राहत येत नाही.
श्री.मच्छिंद्र देवस्थानच्या वतीने १३ हॉस्पिटल आणि ३३ कोव्हिड सेंटर उघडले. त्याचा माध्यमातून अनेक रुग्ण वाचवले. आष्टी,पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यातील नुकसानग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी विविध संस्था, दुग्ध संघ,आष्टी नगरपंचायत पदाधिकारी यांनी मिळून ५० लाख रुपये निधी गोळा केला आहे आणि ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी लोकवर्गणीतून मदत करावी.
उध्वस्त झालेला शेतकरी,गरीब लोक यांना प्रगतीपथावर आणण्यासाठी आपल्याला जमेल तशी मदत करावी लागेल.
यावेळी बोलताना लातूर धर्मादाय सहआयुक्त राजेश सासने म्हणाले की,
महाराष्ट्र शासन,मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी,धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, धर्मादाय उप आयुक्त कार्यालय बीड तसेच श्री.पिंपळेश्वर महादेव मंदिर देवस्थान, आष्टी या संस्थांनी संयुक्तरीत्या केलेले आयोजन अत्यंत कौतुकास्पद आहे. मी सर्व आयोजक संस्था, मान्यवर अधिकारी व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मनःपूर्वक आभार मानतो की त्यांच्या प्रयत्नांमुळे समाजातील गरजू रुग्णांना नवे जीवनदृष्टी लाभली असे शेवटी म्हणाले.
या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, धर्मादाय उप आयुक्त कार्यालय बीड तसेच श्री. पिंपळेश्वर महादेव मंदिर देवस्थान, आष्टी यांनी संयुक्तरीत्या सहकार्य केले.
यावेळी व्यासपीठावर लातूर धर्मादाय सह आयुक्त राजेशजी सासने, बीड धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरी, अध्यक्ष धर्मादाय वकील संघ, ॲड. सालपे पाटील,उपाध्यक्ष
ॲड. राम औटी पाटील, सचिव ॲड.कल्याण गाढे, प्राचार्य तपनकुमार गौडा,आनंदऋषी हॉस्पिटल डॉ. कवडे,संजय मुळे,रामदास डोरले,विजुशेठ सहस्त्रबुद्धे,लक्ष्मण रेडेकर, विनय पटधरिया यांच्यासह आष्टी-पाटोदा-शिरूर तालुक्यातील गणप्रमुख,सरपंच, उपसरपंच,नगरपंचायत पदाधिकारी,सर्व नगरसेवक,कार्यकर्ते,लाभार्थी बांधव-भगिनी आणि आष्टी पत्रकार संघ तसेच वयोवृद्ध महिला, जेष्ठ नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➡️ या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील रुग्णांना आधुनिक वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध करून देणे, जीवनात उजेड निर्माण करणे आणि सामाजिक आरोग्यसंपन्नतेस हातभार लावणे हे उद्देश साध्य झाले आहेत. आमदार सुरेश धस यांनी शिबिराच्या आयोजकांसोबत काम करून शिबिराचे यशस्वी आयोजन सुनिश्चित केले.शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मोफत उपचार, शस्त्रक्रिया व चष्मे उपलब्ध करून देणे ही आमदार सुरेश धस यांची विशेष सामाजिक बांधिलकी दिसून आली. या उपक्रमातून शिबिरातील रुग्ण आणि उपस्थित सर्वांचे जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यात आमदारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.