spot_img
spot_img

बबनराव ढाकणे यांनी विस्थापितांचा आवाज बुलंद केला-शिवाजिराव कर्डिले

पाथर्डी प्रतिनिधी : (अनिल खाटेर) :- ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांनी नगर जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात विस्थापित क्षेत्रातील लोकांचा आवाज बुलंद करण्यासाठी जुन्याकाळी चळवळ निर्माण केली त्यातूनच आम्ही घडलो आणि जनहिताची कामे करू शकलो. पाथर्डी सारख्या दुष्काळी क्षेत्राचे नाव त्यांनी देशपातळीवर पोहोचवले आणि आमच्यासारख्यांना त्यातून प्रेरणा मिळत गेली. आम्ही आमचे भाग्य समजतो की त्यांचा सहवास आम्हाला लाभला आणि आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनात काम करत आहोत अशी सद्भावना माजी आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केली
माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय बबनराव ढाकणे यांच्या दशक्रिया विधी निमित्त आयोजित पागोरी पिंपळगाव येथे श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. यावेळी महंत नामदेव शास्त्री भगवानगड, आमदार मोनिका राजळे, आमदार किशोर दराडे, बीडचे माजी आमदार सुनील धांडे, आदिनाथ शास्त्री महाराज तारकेश्वरगड, रामगिरी महाराज येळी, आमदार निलेश लंके, तेलंगणाचे पोलीस महासंचालक महेश भागवत, सुशीला मोराळे,भगवान फुलसौंदर,सुभाष लांडे, जालिंदर वाघचौरे,रामदास गोल्हार, उद्योजक किरण शेटे, अमोल गर्जे,माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, वसंत लोढा, बाळासाहेब सोनवणे, अशोक मोटकर, शिवाजीराव काकडे,दादासाहेब मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री कर्डिले म्हणाले जिल्ह्यात प्रस्थापितांचा एकतर्फी कारभार सुरू असताना स्वर्गीय बबनराव ढाकणे यांनी पाथर्डी सारख्या ग्रामीण भागातून या व्यवस्थेच्या विरोधात सर्वसामान्यांच्या हितासाठी मोठी चळवळ निर्माण केली. त्यातून प्रेरणा घेत स्वतः मी आमदार बबनराव पाचपुते माजी खासदार तुकाराम गडाख यांनी जिल्ह्यात तिसरा पर्याय निर्माण करण्याचा ठरवलं त्यात आम्हाला काही अंशी यश आलं मात्र हे यश तात्कालीक नव्हतं हे प्रस्थापित व्यवस्थेला धक्का देणार होत. त्यातून सर्वसामान्यांची दखल घेत गेली आणि आज त्याचीच परिनिती आपण अनुभवत आहोत. बबनराव ढाकणे यांनी पन्नास वर्षे महाराष्ट्राच्या समाज हितासाठी आपले योगदान दिले ही सोपी गोष्ट नाही सभागृहात अनेकदा जनसामान्यांचे प्रश्न ते प्रकर्षाने मांडायचे भाषणातून त्यांची लोकांसाठी असलेली पोटतिडकी आम्हाला जाणवायची. बीड जिल्ह्यातून त्यांनी खासदारकी लढवली तेथूनही यश संपादन केले आणि केंद्रात मंत्रीपद मिळवले ही साधी सोपी गोष्ट नाही. बबनराव ढाकणे सारखे व्यक्तिमत्व सामाजिक जीवनात पुन्हा जन्माला येणे शक्य नाही.असे ते शेवटी म्हणाले.
आमदार मोनिका राजळे म्हणाल्या,ऊस तोडणी कामगारांसह तालुक्यातील सर्व मूलभूत समस्या सोडवण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले अनेक दुःख पचवून ते स्वतः समाजासाठी अखेरच्या श्वासापर्यंत झटले त्यांचे सारखे आदर्श व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही.
बीडचे माजी आमदार सुनील धांडे म्हणाले स्वर्गीय बबनराव ढाकणे यांनी ज्या काळी बीडची लोकसभा लढवली त्याकाळी आम्ही तरुण वयात होतो त्यांच्या प्रखर भाषणांनी आम्ही प्रेरित होऊन त्यांच्यासोबत काम केले. ते जिंकले त्यांनी काम पाहिले मात्र त्या पूर्ण कार्यकाळात त्यांच्या राजकीय व्यवहारात कधीही जातीयवादाचा विषय आम्ही अनुभवला नाही. त्यांनी त्या खासदारकीच्या काळात केलेली कामे बीड जिल्ह्यात आजही अजरामर आहेत.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!