spot_img
spot_img

लघु पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे कुत्तरवाडी गावच्या शेकडो एकर शेतीचे नुकसान – पुरग्रस्त शेतकरी चंद्रशेखर दहीफळे ************************************ कुत्तरवाडी तलावाच्या सांडव्याची दुरुस्ती व नुकसान भरपाईची मागणी

पाथर्डी प्रतिनिधी :- परतीच्या पावसाने तालुक्यात मागील आठवड्यात हाहाकार माजवला तालुक्यातील सुमारे 77000 हेक्टर जमीनीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील कुत्तरवाडी (विठ्ठलवाडी) येथील लघु पाटबंधारे विभागाच्या मध्यम प्रकल्पा खाली सांडव्याच्या अर्धवट कामामुळे बाजुच्या सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतीचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकासह शेता मधील मातीही अक्षरशः पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याठिकाणी अर्धवट काम व नदीपात्रात झालेली अतिक्रमणे अनाधिकृत भरावामुळे नदीचा मूळ प्रवाह बदलल्याने व या विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुराचे पाणी घुसले. याबाबत बोलताना शेतकरी चंद्रशेखर दहिफळे यांनी सांगितले. 1988 साली लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने हा तलाव बांधल्यानंतर या तलावाच्या सांडव्याच्या बाजूला शंभर मीटरची नियोजित भिंत असताना या ठिकाणी फक्त वीस मीटर भिंत बांधण्यात आली. तलाव भरल्यानंतर अनेकदा सांडव्याचे अतिरिक्त पाणी आजूबाजूच्या शेतात घुसते लघुपाटबंधारे विभागाकडे शेतकऱ्यांनी अनेक वेळा मागणी केली परंतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले यावर्षी मात्र पावसाने तालुक्यात हाहाकार माजवला असून नदी दुथडी भरून वाहू लागली. नदीचा मुळ प्रवाह बदलल्याने आजूबाजूच्या शेतीत पाणी घुसले व त्यामुळे उभ्या पिकांसह शेतामधील मातीही वाहून जाऊन जमिनीतील माती खालील खडक उघडा पडून शेकडो एकर जमिनी खरड जमिनी म्हणून नापीक जमीन झाल्या आहेत. शेतामधील वहीरी गाळाने बुजुन गेल्या आहेत. पाइपलाइन वाहुन गेली आहे. याची वस्तुनिष्ठ पाहणी करून पंचनामे करावेत. महसूल, कृषी विभाग व लघुपाटबंधारे विभागाने आम्हास नुकसान भरपाई द्यावी अशीच परिस्थिती अनेक शेतकऱ्यांची झाली आहे. या ठिकाणची ही चूक लघु पाटबंधारे विभागाची असून लघु पाटबंधारे विभागाने तातडीने सांडव्याची कालव्याची दुरुस्ती करावी व आम्हाला तुटपुंजी मदत न देता वस्तुनिष्ठ नुकसान भरपाई मिळावी. जेणेकरून शेतकरी पुन्हा आयुष्यात उभा राहिल. अशी मागणी जालिंदर दहिफळे,रंजना दहिफळे, चंद्रशेखर दहिफळे आदी पुरग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!