धामणगाव( प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील विद्युत उपकेंद्रातून धामणगाव घाटापिंपरी देवळाली व अन्य भागातील विद्युत पुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून सतत खंडीत होत आहे म्हणून शेतकरी व विद्युत ग्राहक यांची मोठी कसरत होत आहे.याबाबत विद्युत महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांना वेळोवेळी तोंडी सांगितले तरी देखील विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही म्हणून संतप्त शेतकऱ्यांनी थेट धामणगाव येथील विद्युत उपकेंद्र कार्यालयास घेरावा घातला यावेळी सहाय्यक अभियंता बनकर साहेब यांना निवेदन देण्यात आले त्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले असून येत्या दोन दिवसांत विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही तर सोमवार दि ६ रोजी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येईल असा इशारा या परीसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
धामणगाव येथील विद्युत उपकेंद्रातून जवळपास पंधरा छोट्या मोठ्या गावात विद्युत पुरवठा केला जातो. येथील विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी परीसरातील शेतकऱ्यांना नेहमीच कसरत करावी लागते.यावर्षी परीसरात पावसाचे प्रमाण देखील कमी आहे. तरी पण येशील विद्युत पुरवठा सुरळीत नाही. शेतकऱ्यांना रात्रभर पाणी धरण्यासाठी रात्र डोक्यावर घ्यावी लागते मात्र पिकात पाणीच जात नाही. या उपकेंद्रातून यावर्षी अनेक अनाधिकृत रोहित्र बसविण्यात आले आहेत म्हणून येथे सततच्या विद्युत ग्राहकांना उच्च दाबाने व सुरळीत वीजपुरवठा होताना दिसत नाही म्हणून शेकडो शेतकरी संतप्त होऊन थेट धामणगाव येथील विद्युत उपकेंद्रात हजर झाले होते त्यांनी येथील कार्यालयास घेरावा घातला व सहाय्यक अभियंता बनकर साहेब यांना निवेदन दिले यावेळी त्यांनी दोन दिवसांत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शेतकऱ्यांनी देखील विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी सर्व गावचे सरपंच सामाजिक कार्यकर्ते पत्रकार व शेतकरी विद्युत ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते