spot_img
spot_img

कलासाधना सामाजिक संस्थेतर्फे कलाशिक्षक श्री नरेश लोहार प.पू साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई येथील कलासाधना सामाजिक संस्था यांच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रस्तरीय प.पू. साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा कामोठे येथे संपन्न झाला. भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज नवी मुंबई शाळेतील उपक्रमशील कलाशिक्षक श्री नरेश मारुती लोहार यांना यावर्षीचा पुरस्कार सुप्रसिद्ध सुलेखनकार पद्मश्री मा. अच्युत पालव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.कला आणि शैक्षणिक क्षेत्रात नवीन पिढी घडविण्यासाठी करीत असलेल्या अतुलनीय व उल्लेखनीय योगदानाबद्दल सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.राज्यातून एकूण ८३० अर्ज प्राप्त झाले होते त्यामधून श्री नरेश लोहार यांची निवड करण्यात आली. श्री नरेश लोहार यांना भारती विद्यापीठाचा सेवा गौरव पुरस्काराबरोबर २० पेक्षा जास्त राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. भारती विद्यापीठाचे कार्यवाह मा.आ. विश्वजीत कदम ( बाळासाहेब) भारती विद्यापीठाच्या शालेय शिक्षण विभागाच्या अध्यक्षा आदरणीय विजयमाला कदम( वहिनीसाहेब), भारती विद्यापीठ शालेय शिक्षण विभागाचे संचालक मा. एम. डी. कदम सर, भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल नवी मुंबईचे संचालक आदरणीय डॉ. विलासराव कदम सर, विद्यालयाचे प्राचार्य श्री. बेल्लम आर. टी. सर, उपप्राचार्य श्री. आर. एच. कदम सर,सर्व सेवक तसेच पालक, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले. कलासाधना सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. मेघा महाजन ,श्रीराम महाजन यांचे श्री नरेश लोहार यांनी आभार मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!