आष्टी (प्रतिनिधी)आष्टी नगरपंचायत यांच्यावतीने पर्यावरण पूरक कृत्रिम पावन कुंडात यंदा गणेश विसर्जनाचा अनोखा उपक्रम राबविला गेला.याच उपक्रमांतर्गत दि.६ सप्टेंबर अनंत चतुर्थी रोजी आष्टी शहरातील तलवार नदी पात्रात पावन कुंडाची निर्मिती करून अनेक गणेश भक्तांकडून घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन मंगलमय वातावरणात करण्यात आले.
भक्ती आणि पर्यावरणाचं सुंदर नातं जपणारे आष्टीकर असा निसर्ग संरक्षणाचा संदेश देत शहरवासीयांचा उस्फुर्त प्रतिसाद यावेळी पाहायला मिळाला.गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपण सर्वजण आष्टीचे पर्यावरण जपत आहोत.आपली आष्टी, आपला स्वाभिमान पर्यावरणरक्षक गणेश भक्तांसाठी एक प्रेरणादायक उपक्रम राबवण्यात आला.
आष्टी मधील अनेक गणेश भक्तांनी आपल्या गणरायाचे विसर्जन आष्टी नगरपंचायतच्या पर्यावरणपूरक कृत्रिम तलावामध्ये करून निसर्ग संरक्षणाचा सुंदर आदर्श घालून दिला आहे.
हा उपक्रम पार पाडण्यासाठी मुख्याधिकारी बाळदत्त मोरे, नगराध्यक्ष जिया बेग,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,गटनेते किशोर झरेकर, सभापती सुरेश वारंगुळे,सभापती शरीफ शेख,सभापती इर्शान खान,नगरसेवक भारत मुरकुटे, नगरसेवक श्याम वाल्हेकर,नगरसेवक अक्षय धोंडे,नगरसेवक अरुण निकाळजे, नगरसेवक बाळासाहेब घोडके, बांधकाम अभियंता गहिनीनाथ शिरसाठ,अभियंता अथर बेग,कर प्रशासकीय अधिकारी प्रवीण उंदरे, जगदीश नरवडे,कानडे,नगरपंचायत कर्मचारी शिवकुमार तांबे, दिलीप निकाळजे,संजय निकाळजे,चंद्रकात म्हस्के आदींनी परिश्रम घेतले.