पाथर्डी (प्रतिनिधी) जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर व बाबुजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर आयोजित जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. यामध्ये पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद विदया मंदीर पाथर्डी या विद्यालयातील आठ खेळाडूंची पुणे या ठिकाणी होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा विद्यालयाचे वतीने सत्कार समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड होते. याप्रसंगी बोलताना म्हणाले, की खेळामुळेच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित होतात. खेळातूनच उद्याचा सक्षम व निरोगी भारत तयार होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर विविध खेळांकडे लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता आपले शरीर सुदृढ व निरोगी ठेवण्याचे प्रभावी माध्यम मैदानावरील खेळ !
पुणे येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे:
१७ वर्ष वयोगट मुली : नुसरत सय्यद शेख, प्रतीक्षा सीताराम केदार,अक्षदा राहुल सोनवणे
१७ वर्ष वयोगट मुले: कुबेर संतोष जिरेसाळ ,आनंद गणेश काकडे ,वेदांत वसंत वारे ,संगम संतोष बडे ,पुष्कर प्रमोद दहिफळे
यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक रावसाहेब मोरकर प्रमोद हंडाळ, सतीश डोळे व शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड ,उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड,शिक्षणविस्तार अधिकारी रामनाथ कराड,अनिल भवार,मुख्याध्यापक शरद मेढे, समन्वयक ज्ञानेश्वर गायके, पर्यवेक्षक संपत घारे,महेंद्र तांदळे तसेच विद्यालयातील सर्व अध्यापक, पालक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक रेश्मा सातपुते यांनी केले तर आभार अभिजीत सरोदे यांनी मानले.