spot_img
spot_img

पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत यांच्या हस्ते श्रींची आरती ;विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न

कडा (प्रतिनिधी) कडा येथील मानाचा युवराज गणेश मित्र मंडळाच्या श्रींची आरती मंडळाचे सदस्य तथा पनवेल पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत यांच्या हस्ते करण्यात आली. आरती नंतर मंडळाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली.मिरवणुकीत भुम येथील प्रसिध्द न्यु झंन्कार ब्राँझ बँण्ड यांनी उत्कृष्ट कला सादर केली.पर्यावरणाची व शरीराची काळजी घेत गुलाल ऐवजी रंगीबेरंगी फुलांची उधळण करीत मिरवणूक चा आनंद युवराज मंडळाने घेतला. मंडळाच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मंडळा तर्फे पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत,न्यु झंन्कार ब्राँस बॅण्ड चे संचालक पवन थोरात, महाप्रसादाचे स्वयंपाक बनवणारे आचारी ओंकार अजिनाथ जठाडे,बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस बांधवांचे सत्कार करण्यात आले.तसेच मिरणवणुकी पुर्वी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.मंडळाचे हे ५५ वे वर्षं असून या मंडळात हिंदू -मुस्लीम युवक एकत्रित येऊन दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात. कायद्याचे पालन करत शांततेत मिरवणूक पार पडली. हे मंडळ गत ५५ वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा जोपासत आले आहे. आष्टी तालुक्यातील जुन्या मंडळापैकी हा एक मंडळ असून कडा येथील मानाचा मंडळ म्हणून ओळख आहे.मिरवणुकीत जोरदार आतषबाजी करण्यात आली. मिरवणूकीच्या शेवटी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते आरती करण्यात आली.यावेळी मंडळाचे जेष्ठ सदस्य राऊत सर,अध्यक्ष सुरेश उर्फ बाबु तारू, उपाध्यक्ष महेश दळवी, सचिव सागर बोराटे,मंडळाचे पाच वेळेस अध्यक्षपदी राहणारे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रहेमान सय्यद,घन;शाम ढोबळे पाटील, कौस्तुभ किरण राऊत,आल्ताब शेख,अविनाश ढोबळे,विघ्नेश तारू, शुभम तारू,आरबाज तांबोळी, शिवम इंगवले,आरिफ शेख,ओंकार जठाडे,सलमान सय्यद, विशाल बोराटे,निलेश ढोबळे, आदित्य मोरे, गणेश जठाडे,आवेज पठाण,दर्शन दळवी,मुसेब पानसरे,महेश होळकर,प्रसाद नांगरे,आयान शेख,केतन खंदारे,विक्रम तारु,शिवम तारु, मोईन शेख,अलतमश सय्यद, तन्वीर खान,आकिब खान,सागर खामट,शोएब पानसरे,मुस्तफा सय्यद,रूषी थेटे,आनंद पाचारणे,सह आदी सदस्य उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!