आष्टी (प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील देवळाली गावातील तरुण कुणाल नवनाथ शेकडे याची वयाच्या अवघ्या१८ व्या वर्षी भारतीय नौदलात (रक्षा मंत्रालय भारत सरकार) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड झाली आहे त्याच्या या निवडीमुळे देवळाली गावाचे नाव उज्वल झाले असून कुणाल शेकडे चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.त्याच्या या यशाबद्दल महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज पोर्टल चे संपादक अतुल नारायणराव जवणे, सुनील खाडे सर, दादा खाडे सर, दत्तात्रय आमले, देविदास राजगुरू यांनी कुणाल शेकडे यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आई-वडिलांचा आशीर्वाद आणि अथक प्रयत्न व मेहनतीच्या जोरावर कुणालने हे यश मिळवत भारतीय नौदलामध्ये भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे वडील नवनाथ रामराव शेकडे आणि आई अंजना नवनाथ शेकडे हे शेतकरी कुटुंबातील असून शेती हा मुख्य स्त्रोत असून त्याबरोबर छोटे खाणी कृषी सेवा व्यवसाय सांभाळतात यातूनच घर खर्च भागवत त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांच्या शिक्षणावर भर देत त्यांना घडवले आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज कुणालने केली आहे कुणालच्या निवडीमुळे देवळालीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे आजच्या युवा पिढीने कुणाल शेकडेचा आदर्श घ्यावा अतिशय कमी वयात त्यांनी हे यश मिळवले आहे.