५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस या दिवशी अनेक प्रकाराने गुरु भक्ती व्यक्त केली जाते प्राचीन काळापासून गुरूच्या कार्याप्रति समाजात आदराचे स्थान व मान प्राप्त झाला आहे. “गुरु सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी”
गुरु कसा असावा. याचे अनेक उदाहरणे सांगता येतील गुरु द्रोणाचार्य- एकलव्य सारखा असावा असे अनेक उदाहरणे सांगता येतील पण आत्ताच्या काळातील गुरुच्या बद्दल असणार आदराचं स्थान कायम राहावं , समाजामधली गुरुची प्रतिमाही कायम तसेच असावी यासाठी अनेक गुरुजन आपापल्या परीने प्रयत्न करत असतात समाजाची बांधिलकी जोपासावी लागते आपणही समाजाचे काहीतरी देणं असतो या उद्देशाने समाजाप्रती शैक्षणिक कामाबरोबर समाज हिताचेही काम करणं हे गुरुचे आद्य कर्तव्य मानले जाते आणि ते काम करत असताना समाज योग्य वेळी त्या कामाची दखल घेऊन शाबासकीची थाप निश्चित पाठीवर टाकतो. अशाच काही निवडक गुरूंबद्दल सांगायचं झालं तर आष्टी तालुक्यापासून पासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर कल्याण- विशाखापट्टणम या महामार्गावर डोंगराच्या कुशीत वसलेले दोन- तीन हजार लोकसंख्येचे गाव म्हणजे “डोईठाण” याच गावात एका ब्राह्मण कुटुंबात आणि शैक्षणिक क्षेत्राचा वारसा असलेल्या परिवारात जन्म घेतलेला पण छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा वसा आणि वारसा लाभलेल एक आगळावेगळ व्यक्तिमत्व म्हणजे संतोष दाणी.यांच्या विषयी सांगताना वरील गोष्टींचा विचार करता आदर्श शिक्षक पुरस्कार हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये खरंच आदर्श असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला मिळाला पाहिजे हे सर्व समजायला पारखी सुद्धा जातिवंत असला पाहिजे म्हणजे त्याला खरे काय खोटे काय ओळखता आले पाहिजे शेवटी खरं हे लपून राहत नाही अशीच काहीशी परिस्थिती संतोष दाणी सरांची.त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एका छोट्या गावातून आपल्या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली.प्राथमिक शिक्षण , माध्यमिक शिक्षण यानंतर डी.एड केल्यानंतर प्रथम नेमणूक मिळाले ते पहिले गाव काकडवाडी.त्यानंतर शिराळ , पिंपरी ,वैतागवाडी या गावाला खरंच न वैतागणारा गुरुजी म्हणजे संतोष दाणी , जिथे पद प्रतिष्ठा डावलून शैक्षणिक कामाबरोबर सामाजिक कार्य करणारे सुरुवातीपासूनच जातीयते विरुद्ध काम करणारे आपल्या मूळ गावात प्रथमतः ब्राह्मण समाजात जन्मला आलेले असताना सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिली जयंती साजरी करुण संतोष दाणी सरांनी याच माध्यमातून जातीयता नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरुवातीलाच केला. सर्वोत्तम प्रशासक कसा असावा याच मूर्तीमंत उदाहरण , ज्ञानार्जनाचा वसा आणि वारसा घेतलेले विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानणारे गुरुजी , दगडालाही पाझर फोडणारे उत्कृष्ट निवेदक , उत्कृष्ट संयोजक ,छत्रपती शाहू फुले आंबेडकर विचाराचे गाढे अभ्यासक , आदर्श शिक्षक , आदर्श लेखक , आदर्श मुख्याध्यापक , आदर्श पत्रकार , स्वतःच्या घरात आंतरजातीय विवाह सोहळा लावून समाजात आदर्श निर्माण करणारा प्रामाणिकपणाचा शिलेदार , नव तरुणांना मार्ग दाखवणारा व दिशा दाखवणारा दिपस्तंभ , धार्मिक क्षेत्रात भजन , कीर्तन महोत्सवात सहभाग घेणारे तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबर अध्यात्माची गोडी निर्माण करणारा जो धर्म माणसाला माणूस म्हणून वागवत नाही तो धर्म कसला , रमजान महिन्यांमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करणारा , समाजामध्ये वृक्षरोपण करून झाडाचे महत्व पटवून देणारा ,अंधश्रद्धा निर्मूलनांत सक्रिय सहभाग घेऊन मुळापासून उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करणारा , लोकसंख्येबरोबर शिक्षणाची जागृती करणारा , प्रौढसाक्षरता अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करणारा , रक्तदान सर्वश्रेष्ठ दान ही संकल्पना यशस्वी पार करणारा , कस्ट्राईब संघटनेच्या माध्यमातून समाजाचे काम करणारा ,मुस्लिम समाजाच्या घरी महालक्ष्मीचे आगमन झाल्यामुळे साडी चोळी देऊन त्यांचाही सत्कार करणारा , शाळेमध्ये सर्व महापुरुषांची जयंती , पुण्यतिथी साजरी करून समानतेचा संदेश देणारा , गाव विकासासाठी गावात शौचालय , देवालय आणि विद्यालय असावे ही संकल्पना यशस्वी करण्यात सक्रिय सहभाग , याचबरोबर आदर्श शिक्षक निवडण्यासाठी साने गुरुजी सामाजिक प्रतिष्ठान ची स्थापना , दिव्यांगांना सन्मानाची वागणूक देण्याचा उपक्रम , पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यात सक्रिय सहभाग , पालकांचे मेळावे घेणे ,महिला सबलीकरणासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करणे , चावडी वाचनातून प्राथमिक शिक्षणाची अंमलबजावणी करणे , साक्षरता अभियान यशस्वीपणे राबवलं , तंटामुक्त गाव योजना ही सुद्धा समाजाला आदर्शवत ठरवून दिली.जात धर्म पंथाने कोणताच माणूस श्रेष्ठ ठरत नाही हा विचार जनमानसात रुजवला , त्याचबरोबर महिला मेळावा घेणे , शैक्षणिक गुणवत्ता अभियान राबवणे , लेखन वाचन प्रकल्प राबवणे , चावडी वाचन प्रकल्प मधून शैक्षणिक प्रयत्न करणे , विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे ,गुणवंताच्या सत्कार समारंभ उपस्थित राहणे , साधन व्यक्ति म्हणून मार्गदर्शन , बोलक्या भिंतीची योजना राबवणे ,माता पालक मेळावे घेणे ,बाल आनंद मेळावा घेणे , आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन , वृक्षारोपण , मुलगा -मुलगी समान उपक्रम , स्वच्छता अभियान , प्रभारी मुख्याध्यापक म्हणून उत्तम कामगिरी तसेच प्रशासक म्हणून कार्यही उत्तमच . विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे ,संपूर्ण साक्षरता अभियान यशस्वीपणे रबविणे , शाळेमध्ये १४ दापत्यांचा कन्यारत्न पुरस्कार देऊन सन्मान करणे , विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेवर भर देणे , परिसर स्वच्छ ठेवणे , शालेय आरोग्य कार्यशाळा आयोजन करणे , रुग्णांना फळाचे वाटप करणे , साक्षरता दिंडीचे आयोजन करणे , बाल आनंद मेळावा आयोजित करणे , गैरहजरी मुक्त शाळा हा उपक्रम जीवन शिक्षण अंकात प्रसिद्ध करणे , त्याचबरोबर समाजाचा शाळेसाठी सहभाग मिळवण्यासाठी गावातील प्रत्येक व्यक्तीला ज्यांना वाढदिवस आपला साजरा करायचा आहे तो वाढदिवस बाहेर हॉटेलमध्ये साजरा न करता तो शाळेमध्ये साजरा करावा त्या माध्यमातून शाळेला शैक्षणिक साहित्य , शाळेमध्ये लागणारे विविध उपकरणे असतील , शाळेला लागणारे साहित्य असेल या माध्यमातून मिळवणे शाळेत देणगी मिळवणे , वरील संकल्पनेतून समाजाचा सहभाग हा शाळेसाठी फार महत्त्वाचा आहे आणि यामुळे शाळेची प्रगतीत वाढ होण्यास मदत होते. असे वरील सर्व उपक्रम ज्या व्यक्तिमत्त्वाने राबविले व शैक्षणिक उंची वाढवली असे आदर्श शिक्षक म्हणून संतोष दाणी सरांकडे पाहिलं जाते वडीलच माझे गुरु. या वडिलांनिही शिक्षणाच्या माध्यमातून अनेक हजारो विद्यार्थी घडवले त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन संतोष दाणी सरांनी आपलं शैक्षणिक कार्य हे पुढे चालू ठेवलं आणि आजही ते ज्ञानदानाबरोबर समाजकार्यामध्ये त्यांनी कोल्हापूर येथील पूर परिस्थितीसारख्या आपत्तीच्या काळात तिथे जाऊन मदत करणे , तसेच कोरोना काळामध्ये अनेक गरजवंत कुटुंबांना सहकार्य करणे अशा अनेक घटना सांगता येतील यातूनच त्यांनी समाज कार्यामध्ये त्यांचा ठसा कायम ठेवला.आणि नेहमीच उमटवत आहेत अशा आदर्श गुरूला खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक पुरस्कार देताना कुणाच्याही मनात शंका येण्याचे काहीच कारण नाही खरा आदर्श गुरु आज निवडला याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो संतोष दाणी सरांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यापैकीच पद्मपाणि पुरस्कार , आदर्श महाराष्ट्र गौरव ,भारत जीवन गौरव , कोरोना योद्धा , आदर्श समाजसेवक ,आदर्श मराठी भूषण पुरस्कार , संत गाडगेबाबा गुणवंत शिक्षक पुरस्कार , गंगाई बाबाजी पुरस्कार यांसह जवळपास २५ पुरस्कारांनी संतोष दाणी सरांना सन्मानित केले आहे. नुकताच जाहीर झालेल्या स्वामी विवेकानंद शिक्षकांची पतसंस्था मर्यादित कडा या संस्थेने दिलेला आदर्श पुरस्कार खऱ्या अर्थाने सार्थ झाला आणि यामुळेच संस्थेच्या पुरस्काराने शिक्षण विभागाची मान खऱ्या अर्थाने रायगडाच्या टोका इतकी उंचवलेली दिसून येते. विशेष म्हणजे जि.प.कें प्राथ शाळा शिराळ या शाळेलाही बीड जिल्हा पत्रकार संघाकडून आदर्श शाळा पुरस्कार मिळाला तोही संतोष दाणी सरांच्या मार्गदर्शनाखालीच आणि चारही सहकारी शिक्षकांच्या मदतीनेच म्हणूनच शिक्षक दिनानिमित्त संतोष दाणी सरांच्या पुढील वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!!
शिक्षक दिन विशेष…..
प्रासंगिक :- अमोल जगताप
मो.९७६६६७६१६४