spot_img
spot_img

सुवर्णयुगच्या वतीने ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे मोठे काम – सरपंच संजिवनी पाटील

पाथर्डी प्रतिनिधी (अनिल खाटेर) : – आपल्या गावातील व परिसरातील ऐतिहासिक वास्तू या आपल्याला आपल्या इतिहासाची, परंपरेची आणि संस्कृतीची आठवण करून देतात. त्यांचे जतन करणे हे केवळ शासनाचे काम नसून समाजातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी निस्वार्थ भावनेने सुवर्णयुग तरुण मंडळाने समर्थपणे पार पाडत वारसा जपण्याचे काम केले आहे. मंडळाच्या या उपक्रमामुळे पुढील पिढ्यांना आपल्या इतिहासाची जाणीव राहील, असे प्रतिपादन खर्डा गावच्या सरपंच तथा भाजप महिला अध्यक्षा सौ. संजीवनी पाटील यांनी केले.

सुवर्णयुग तरुण मंडळ पाथर्डी यांच्यावतीने किल्ले शिवपट्टण (खर्डा ता. जामखेड) येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी संजीवनी पाटील बोलत होत्या.यावेळी बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील,ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे, भाजपा तालुका सरचिटणीस बाळासाहेब गोपाळघरे,विस्तार अधिकारी अशोक आंधळे, केशव गायकवाड, धीरज उदमले, हुसेन बादशाह, मंडळाचे अध्यक्ष गोपालसिंग शेखावत, वैभव शेवाळे आदी उपस्थित होते.

वैजीनाथ पाटील म्हणाले,आजच्या पिढीला इतिहासाची खरी जाणीव करून देणे गरजेचे आहे. आपण आपला इतिहास विसरलो तर आपली मुळेच हरवतील. त्यामुळे अशा उपक्रमातून मंडळाने समाजात जागरूकता निर्माण करून एक पाऊल पुढे टाकले आहे. ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी सरकार, ग्रामपंचायत आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. सुवर्णयुग मंडळाने जो आदर्श ठेवला आहे, तो प्रत्येक संस्थेने आत्मसात करावा.

मंडळाने किल्ल्याच्या आतील पायऱ्यांवरील, प्रवेशद्वार येथील झाडाजुडपे,गवत आणि कचरा गोळा करून स्वच्छता केली.मंडळाचे मोहनजी यादव, अमोल कांकरिया, मोनिष उदबत्ते,ओमकार जोशी, मोनल जोजारे, शैलेंद्र दहिफळे, अक्षय दातीर, ओम पाचरणे, मुकुंद सुराणा, कुणाल महानवर, दत्ता पंडित, सचिन आल्हाट, सनी भोसले, अभी कांबळे, किरण दिनकर, अजिंक्य घोरपडे, लखन दोडके आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे यांनी आभार मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!