spot_img
spot_img

सुवर्णयुग प्रश्नमंजुषा स्पर्धेत श्री तिलोक जैन विद्यालयाने पटकाविला प्रथम क्रमांक

पाथर्डी (प्रतिनिधी) :- यूपीएससी, एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून जगणाऱ्या तरुणाईसाठी सामान्य ज्ञानाचा पाया भक्कम असणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थीदशेतच वाचनाची आवड निर्माण होऊन गुणवत्तेत भर पडावी या उद्देशाने सुवर्णयुग प्रश्नमंजुषा उपक्रम राबविण्यात आला असून, हा उपक्रम पुढील पिढीला शासनातील विविध पदांवर पोहोचण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन रेणुका माता मल्टीस्टेट बँकेचे चेअरमन प्रशांत भालेराव यांनी केले.

पाथर्डी शहरातील शेवाळे गल्ली येथील सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने अंतर विद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भालेराव बोलत होते. याप्रसंगी चैतन्य अर्बन बँकेचे चेअरमन अनंत ढोले, महाराष्ट्र बँकेचे शाखा अधिकारी दिनेश सांभरिया, सहदेव दादा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेंद्र शिरसाट,गोपालसिंग शेखावत, वैभव शेवाळे,राजेंद्र शेवाळे, संजय उदमले तर पारितोषिक वितरणासाठी गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड,विश्वविनायक मल्टीस्टेटचे चेअरमन मोदक शहाणे, आदी उपस्थित होते.

ढोले म्हणाले,अभिमान वाटावा असे कार्य सुवर्णयुग तरुण मंडळ करत आहे. यश हे एका रात्रीत मिळत नसते, त्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागतात.विद्यार्थी वय हे आयुष्यातील अतिशय महत्त्वाचे टप्पे आहे. आज मोबाईल व टीव्हीच्या वाढत्या आकर्षणाकडे दुर्लक्ष करून जर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा सातत्यपूर्ण सराव करतील, तर नक्कीच यश मिळवता येईल. भारताचे भविष्य हे विद्यार्थ्यांच्या यशावर अवलंबून आहे. ते भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सुवर्णयुग तरुण मंडळाने अंतरविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करून एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे.सुवर्णयुग तरुण मंडळाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञानाची आवड वाढून त्यांची स्पर्धा परीक्षेकडे ओढ निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यंदाची प्रश्नमंजुषा स्पर्धा ही चुरशीची होऊन यामध्ये प्रथम क्रमांक श्री तिलोक जैन विद्यालयाने पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर व श्री.विवेकानंद विद्या मंदिर या विद्यालयांना विभागून देण्यात आला आहे. तर तृतीय पारितोषिक हे संत ज्ञानेश्वर विद्यालयाला मिळाले आहे.या प्रश्नमंजुषा परीक्षेमध्ये शहरातील एकूण चार विद्यालयातील संघांनी सहभाग नोंदवला होता. एका विद्यालयाचे दोन विद्यार्थी असे एकूण आठ विद्यार्थी यात सहभागी झाले होते. स्पर्धेच्या चार प्रश्नांच्या फेऱ्या घेण्यात आल्या.यंदाचे सुवर्णयुग अंतर विद्यालयीन प्रश्नमंजुषाचे हे पंधरावे वर्ष होते. या स्पर्धेसाठी शाहरुख शेख, मोनीश उदबत्ते, सोनल जोजारे, राहुल भगत, कुणाल महानवार, ओम डागा, मुकुंद लोहिया, मुकुंद सुराणा,अँड. प्रतीक वेलदे, उमेश रासने, दत्ता पंडित,शैलेंद्र दहिफळे, मोहन यादव आदींनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक तथा विद्यार्थ्यांबरोबर प्रश्न उत्तरासाठी संवाद साधत वैभव शेवाळे यांनी स्पर्धा घेतली.सूत्रसंचालन अभय गांधी यांनी करून आभार अमोल कांकरिया यांनी मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!