आष्टी (प्रतिनिधी) कडा शहराचे माजी सरपंच तथा उद्योगपती संपत दादा सांगळे यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्यावर कडा येथील स्मशानभूमीत हजारोंच्या संख्येने जनसमुदायच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
अतिशय मनमिळाऊ, शांत, संयमी असे व्यक्तिमत्त्व असलेले कडा शहराचे माजी सरपंच संपत सांगळे यांचे शनिवार (दि.३०)रोजी दुपारी ४ च्या दरम्यान ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ५o होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुली,जावई असा मोठा परिवार आहे.त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्यावर कडा येथील स्मशानभूमीत रात्री ७.३० वा.हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.