spot_img
spot_img

सुवर्णयुग तरूण मंडळाची लक्षवेधी मिरवणूक.. पाथर्डीत गणरायाचे उत्साहात स्वागत

पाथर्डी प्रतिनिधी (अनिल खाटेर):- पाथर्डी शहरासह तालुक्यात काल गणेश भक्तांनी ढोल ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत मोठ्या उत्साहात करत गणेशाची प्रतिष्ठापना केली.
शहरातून सुवर्णयुग तरुण मंडळाने पारंपारिक वाद्यांच्या निनादात काढलेली मिरवणूकीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. राज्यातील सुप्रसिद्ध अमर ब्राॅस बॅन्ड, जामखेड येथील शंभू सूर्य ग्रुपचे मर्दानी खेळ, मल्लखांब प्रात्यक्षिके, ‘मरावे परी.. अवयवरुपी उरावे’ हे पथनाट्य सादर करत जनजागृती केली. मंडळाच्या कार्यकर्त्यांची एकसारखी वेशभूषा, महीला कार्यकर्त्यांची एकसारखी वेशभूषा, आकर्षक रथात स्थानापन्न पर्यावरण पूरक शाडु मातीची गणेशमूर्ती, सुवर्णयुगच्या या गुलाल व डीजे मुक्त शिस्तबद्ध मिरवणूकीने शहरवासीयांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मिरवणूक मार्गावर हजारो नागरिकांनी या लक्षवेधक मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. यावेळी अवयवदानाची गरज व माहिती असलेले पत्रके वाटण्यात आली. मिरवणुकीत महीलांच्या हाती ही अवयवदान माहिती असलेले बॅनर होते. सकाळी नवीपेठेतुन प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक यांच्या हस्ते गणेशपुजन व श्रीफळ वाढवून या मिरवणुकीचा प्रारंभ झाला. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष गोपालसिंग शेखावत, ट्रस्टचे अध्यक्ष वैभव शेवाळे, रेणुकामाता पतसंस्थेचे व्यवस्थापक अश्वलिंग जगनाडे, उपाध्यक्ष उमेश रासने, उद्योजक महेश पाथरकर, मुन्ना खलिफा, प्राचार्य अजय भंडारी, डॉ. अभय भंडारी, डॉ. सचिन गांधी, बंडूशेठ दानापुरे, दत्ता पंडित, शाहरुख शेख, मोनिष उदबत्ते, शैलेंद्र दहिफळे, मुकुंद सुराणा, योगेश घोडके, दिगंबर जोजारे, गणेश बाहेती, दीपक भागवत, सतिश टाक, प्रतीक वेलदे, कुणाल महानवर, हरिसिंग राजपुरोहित, किशोर देवा पांडव, अभय गांधी मुकुंद सुराणा, ओम जोशी, दिंगबर जोजारे, गणेश महालकर आदी उपस्थित होते तर महिला अध्यक्षा आशा जोजारे, सुनीता उदबत्ते, शीतल लोहिया, उज्ज्वला शेवाळे, रोशनी कांकरिया, संगीता शेवाळे, डॉ. सोनाली भंडारी, दीपाली गांधी आदी मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.
यावर्षी नगरपरिषदेने गणपती मुर्ती स्टाॅल व सजावट साहित्य स्टॉल साठी बाजारतळात जागा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे चौकाचौकात होणारी गर्दी, वाहतूक समस्या व नागरिकांची गैरसोय टळली.
शहरात सकाळपासून गणेशमूर्ती, तसेच इतर साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी बाजारातळात गर्दी केली होती. दुपारपर्यंत घरगुती गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. दिवसभर अधून मधून बरसणाऱ्या पावसाच्या रिमझिम सरीने वातावरण उत्साहवर्धक बनवले होते.
शहरातील नवोदय, जय भवानी, गणेश पेठ, कसबा, दगडमठ, दोस्ती तरूण मंडळ, सुवर्णयुग परिवार ट्रस्ट, श्रीराम मित्रमंडळ, अष्टवाडा, नेता सुभाष, व्यापारी, न्यू दोस्ती, साईनाथ सेवा मंडळ, नाथनगर, वामनभाऊ नगर, सीआरपी बॉईज, एकलव्य, जगदंब युवा प्रतिष्ठान, मोरया प्रतिष्ठान, संत वामनभाऊ, छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप
आदी मंडळांनी रात्री उशिरापर्यंत वाजत गाजत बाप्पाचे स्वागत करत गणेश प्रतिष्ठापना केली.
जगदंब प्रतिष्ठानच्या सार्वजनिक गणेश मंडळात आम्ही नगरकर ढोल पथक, फटाक्यांची आतषबाजी व तोफांच्या सलामीसह गणेशाचे स्वागत करून स्थापना करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष ॲड प्रतीक खेडकर यांच्यासह शकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरात वाड्या वस्त्यासह सुमारे ४० सार्वजनिक मंडळांनी गणेशमूर्तीची स्थापना केली.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!