पाथर्डी (प्रतिनिधी):- आपल्याला भविष्यात काय व्हायचे आहे हे विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच ठरवावे व ध्येय निश्चित केले तर जिवनात यशस्वी व्हाल असे प्रतिपादन
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस
बापूसाहेब डोके यांनी केले.,
सौ.लक्ष्मीबाई शांताराम डोके समाज विकास प्रतिष्ठान अहिल्यानगर संचलित
न्यू इंग्लिश स्कूल आल्हनवाडी येथील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थी मेळावा व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापुसाहेब डोके होते. यावेळी संस्थेच्या सचिव सौ.आशादेवी बापुसाहेब डोके , संस्थेचे संचालक महेश डोके, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज गव्हाणे,ह.भ.प. अंकिता ताई खांडगे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे बोलताना बापूसाहेब डोके यांनी सांगितले की, यापुढे प्रत्येक वर्षी माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांवर धार्मिक संस्कार होण्यासाठी शाळेत प्रवचन आणि किर्तनाचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील आणि मराठी शाळेतील मुलेच यशस्वी होतात. शाळेत भरपूर ज्ञान मिळते. शिक्षकांनी वैयक्तिक लक्ष देऊन विद्यार्थी घडवावे. आपल्या शाळेचा एक विद्यार्थी इस्रो मध्ये शास्त्रज्ञ आहेत याचा मला अभिमान वाटतो., अंधश्रद्धेवर विश्वास ठेऊ नका. समाजात वावरताना दुसऱ्यला आनंद द्या आपोआप आपल्याला मिळेल.हभप अंकीताताई खांडके व ज्ञानेश्वर महाराज गव्हाणे हे आमचे विद्यार्थी आहेत हि कौतुकास्पद बाब आहे.
ह.भ.प. ज्ञानेश्वर गव्हाणे महाराज यांनी सांगितले कि, मी या शाळेचा विद्यार्थी आहे याचा मला अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांनी नियमित व भरपूर अभ्यास करावा. अभ्यासाने माणसे मोठी होतात. ह.भ.प. अंकिताताई खांडके यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी जिवनात यशस्वी होण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा आदर्श घ्यावा. शाळेने आमच्यावर चांगले संस्कार रूजविले. भविष्यात मोठे व्हा आणि आपले आई वडील व शाळेचे नावलौकिक करा. आत्मविश्वास ठेवा जिवनात यशस्वी व्हाल.
बबनराव औटे यांनी सांगितले की, ग्रामीण भागात डोके बंधूंनी शाळा सुरू करून चांगले काम केले. त्यांचे सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. माजी जि प सदस्य रवि पाटील यांनी सांगितले की, शाळेचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत यांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घेऊन वाटचाल करावी. शिक्षकांनी विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत
यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते बबनराव औटे, प्रा. राजु पाचे,सरपंच परमेश्वर गव्हाणे,माजी सरपंच मच्छिंद्र पाटील गव्हाणे,नवनाथ तांदळे, मुरलीधर शेकडे, हरिभाऊ तांदळे,माजी सरपंच राधाकृष्ण कर्डिले, उपसरपंच योगिता कर्डिले, पत्रकार दिगंबर बोडखे, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज पोर्टल चे संपादक अतुल जवणे, सुनील खाडे सर,मंगलताई गव्हाणे, पोलिस उपनिरीक्षक भरत भूकन, प्राचार्य गर्जे,माजी सरपंच प्रल्हाद कर्डिले,आदिनाथ औटे, ऋषिकेश गव्हाणे,आण्णासाहेब औटे,यांच्या सह
आल्हनवाडी, देवळाली परिसरातील पालक व ग्रामस्थ तसेच आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रा. राजु पाचे, सरपंच मंगलताई म्हस्के, आदिनाथ ओटे,दिपाली भुकन यांनी आपले मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दहातोंडे यांनी केले. सुत्रसंचलन राऊत यांनी व उपस्थितांचे आभार फुंदे यांनी मानले.