कडा (प्रतिनिधी) येथील मानाचा गणेश मंडळ म्हणून ओळख असलेला बाराभाई गल्लीतील मानाचा युवराज गणेश मित्र मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. युवराज गणेश मित्र मंडळ हे गत ५५ वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा जोपासत आले आहे. गणेशोत्सव सोहळा २०२५ साजरा करण्यासाठी मंगळवार रोजी दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्वानुमते पुढीलप्रमाणे कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्ष पदी सुरेश उर्फ बाबु तारू, उपाध्यक्ष पदी महेश दळवी तर सचिवपदी सागर बोराटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी मंडळाचे पाच वेळेस अध्यक्ष पदी राहणारे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रहेमान सय्यद,घन;शाम ढोबळे पाटील, पोलिस उपनिरीक्षक किरण राऊत,आल्ताब शेख,अविनाश ढोबळे,विघ्नेश तारू, शुभम तारू,आरबाज तांबोळी, शिवम इंगवले,आरिफ शेख,ओंकार जठाडे,सलमान सय्यद, विशाल बोराटे,निलेश ढोबळे, आदित्य मोरे, गणेश जठाडे,आवेज पठाण,दर्शन दळवी,मुसेब पानसरे,महेश होळकर,प्रसाद नांगरे,आयान शेख,केतन खंदारे,विक्रम तारु,शिवम तारु, मोईन शेख,अलतमश सय्यद, तन्वीर खान,आकिब खान,सागर खामट,शोएब पानसरे,मुस्तफा सय्यद,रूषी थेटे,आनंद पाचारणे,सह आदी सदस्य उपस्थित होते.