spot_img
spot_img

सरपंच दत्तात्रय खोटे यांना राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते भूमिपुत्र पुरस्काराने सन्मानित

आष्टी(प्रतिनिधी) स्वतःच्या गावाच्या विकासासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या सरपंचांना दैनिक लोकमतच्या वतीने दरवर्षी ‘भूमिपुत्र पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाते. या पुरस्कारासाठी बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून योग्य उमेदवारांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण) गावचे सरपंच दत्तात्रय खोटे यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली होती.
शनिवार, दि. २३ ऑगस्ट रोजी झालेया एका समारंभात महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे, माजी मंत्री तथा लोकमत मीडियाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा आणि संपादक नंदकिशोर पाटील यांच्या हस्ते त्यांना हा लोकमत भूमिपुत्र राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्रामीण भागातील समाजकारण, शिक्षण, कृषी, जलसंधारण, पर्यायवरण, ग्रामविकास इत्यादी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे आणि गावाला विकासाच्या मार्गावर नेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना या पुरस्काराद्वारे गौरवण्यात आले. पुरस्कार स्वरूपी स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सरपंच दत्तात्रय खोटे यांना भूमिपुत्र पुरस्कार मिळाल्याबद्दल सांगवी (पाटण) गावात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी व सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी सरपंच यांच्या या सन्मानाचे अभिनंदन केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!