पाथर्डी (प्रतिनिधी):- पाथर्डी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा तसेच अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत. शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवुन मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी करत पाथर्डी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व जिल्हा राष्ट्रवादी महीला आघाडीच्या वतीने प्रांताधिकारी प्रसाद मते यांना निवेदन देण्यात आले.
पाथर्डी तहसील कार्यालय समोर सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला यावेळी तालुका राष्ट्रवादीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, मा.नगरसेवक बंडू बोरूडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा योगिता राजळे, महिला तालुका अध्यक्षा सविता भापकर, सोमनाथ बोरूडे, डॉ रामदास बर्डे, आप्पासाहेब बोरूडे, लक्ष्मण डांगे, संदीप काटे, हुमायून आतार, माणिक वावरे, लालाभाई शेख, देवा पवार, सोमनाथ माने, राजेंद्र हिंगे, चंद्रकांत भापकर, महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्योती जेधे, अनिता गायकवाड, शुभांगी राजळे, ज्योती भापकर, दिपाली आंधळे, यमुना उराडे, शबाना शेख, एकनाथ उराडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजळे म्हणाले की,
काल शासनाने राज्यातील काही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून त्यामध्ये पाथर्डी तालुक्याचा समावेश नाही. तालुक्यात पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. यावर्षी तालुक्यात पुर्णतः दुष्काळी परिस्थिती आहे अनेक भागात पावसाअभावी पेरण्या झालेल्या नाहीत, तसेच जिथे थोड्याफार झाल्या होत्या तिथे ही असलेली पिके वाया गेली आहेत. प्रशासनाकडून झालेली ही चूक तातडीने दुरुस्त करावी आपण शासनाला तातडीने प्रस्ताव पाठवून पाथर्डी तालुका दुष्काळी जाहीर करुन शेतकर्यांना तातडीची मदत द्यावी. तसेच अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण आंदोलन सुरु आहे. पाथर्डी येथे ही सकल मराठा समाजाच्या वतीने तहसिल कार्यालय येथे उपोषण सुरु असून अद्यापपर्यंत शासनाने आरक्षण देण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तरी आमची मागणी आहे मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे. तसेच याप्रश्नी उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चाललेली असून त्यांना काहीही झाल्यास सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनाची राहील. हे दोन्ही निर्णय तातडीने न झाल्यास तालुक्यात मोठे आंदोलन उभे करू व राज्य शासनाच्या कोणत्याही पदाधिकारी व अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही असा इशाराही यावेळी शिवशंकर राजळे यांनी दिला.